सोमाटणे:
विठुमाऊली सोशल फांऊडेशनच्या वतीने दारुंब्रे येथे विणकाम प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षण शिबिराचा समारोप माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
विठु माऊली सोशल फांऊडेशन पवन मावळातील प्रत्येक वाडी वस्तीवर वेगवेगळ्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून नेहमी उपक्रम घेत आहेत. समाज सेवेचा वसा घेतलेली ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासुन निस्वार्थी पणे काम करते.
शासकीय योजना, समाज उपयोगी काम, वेगवेगळे प्रशिक्षण तरुणांना व्यवसायीक कर्ज योजना अश्या विविध माध्यमातुन काम करत आहे. दारुंब्रे गावातही देल्या दहा दिवसा पासुन कपड्यावरील विनकाम कस कराव, त्यातुन कुटुंबा साठी आर्थिक उभारणी कशी करता येईल याच प्रशिक्षण महिलांना देण्यात आले. गावातील असंख्य महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी महिलांना मार्गदर्शन करत विठुमाऊली सोशल फांऊडेशनच्या कामाच कौतुक केले. विठुमाऊली सोशल फांऊडेशनचे संस्थापक अध्यक्ष किरण राक्षे यांनी संस्थेच्या माध्यमातुन सुरु असलेल्या विविध कामाचा आढावा घेतला.
यावेळी भाजपाचे प्रभारी प्रशांत ढोरे,भाजपा संघटनमंत्री किरण राक्षे , सभापती ज्योती शिंदे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, मावळ तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मणराव शितोळे, बाळासाहेब खांडभोर, सुमित्रा जाधव, रचना विधाटे, सोनाली शेलार, सरपंच रोहन जगताप, उमेश आगळे, उपसरपंच माया आगळे, हिरामण सोरटे, सुर्यकांत सोरटे, यादव सोरटे, संदिप सोरटे, अंकुश सोरटे , राजु सोरटे, मीनाक्षी सोरटे, सुरेखा केदारी, शेफाली कराळे, अर्चना विधाटे, अश्विनी भोंडवे, ट्रेनर विनिता गेंगजे आदि उपस्थित होते.
स्वागत मीनाक्षी सोरटे यांनी केले. प्रास्ताविक सूर्यकांत सोरटे यानी केले.आभार यादव सोरटे यांनी मानले. सुत्रसंचालन बाळासाहेब खांडभोर यांनी केले.

error: Content is protected !!