वडगाव मावळ :
राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकाच दिवशी मावळातील टाकवे, कान्हे डोंगरगाव या परिसरातील अवैधरीत्या गावठी दारूची निर्मित्ती व विक्री तसेच ताडी केंद्रांवर चार वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारून तब्बल ५९ लिटर ताडी,१५ हजार ६०० लिटर दारूचे कच्चे रसायन, ७३ बँरेल व एक १ हजार लिटरची मोठी प्लास्टिकची टाकी असा एकूण ३ लाख २८ हजार ९१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून संबंधित दोघांना अटक करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दखल करण्यात आला आहे.
मावळ तालुक्यातील टाकवे,कान्हे व डोंगरवाडी परिसरात अवैधरीत्या हातभट्टी उभारून गावठी दारूची निर्मित्ती व विक्री तसेच अवैद्यरीत्या ताडीविक्री केली जात असल्याची माहिती तळेगाव दाभाडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक राजाराम खोत यांना मिळाली होती.
त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय आयुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक संतोष झगडे, उपअधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राजाराम खोत,दुय्यम निरीक्षक स्वाती भरणे, प्रवीण देशमुख, सहाय्यक दुय्यम निरीक्षक अशोक राऊत,जवान भगवान रनसुरे,भागवत राठोड,राहुल जौंजाळ, हनुमंत राऊत यांच्या पथकाने गुरुवारी (दि.२९) एकाच दिवशी टाकवे व कान्हे येथील ताडीविक्री केंद्रावर कारवाई करून ५९ लिटर ताडी व इत्तर साहित्य असा एकूण १ हजार ३१० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. व तेथील ताडी विक्री करणाऱ्या ईश्वर लक्ष्मण तेलंग (रा. टाकवे त.मावळ), मोहन नारायण शिंदे (रा.नायगाव ता.मावळ) यांना अटक केली आहे.
गुरुवारी दुपारी डोंगरगावच्या परिसरात वेगवेगळ्या दोन ठिकाणी हातभट्टी उभारून गावठी दारूची निर्मित्ती व विक्री करत असलेल्या ठिकाणी छापा मारून सदर ठिकाणी असलेले १५ हजार ६०० लिटर कच्चे रसायन , २०० लिटर मापाचे लोखंडी व प्लास्टिकचे असे ७३ बँरेल व १ हजार लिटर मापाची १ प्लास्टिकची टाकी असा एकूण ३ लाख २८ हजार ९१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

error: Content is protected !!