वडगाव मावळ:
महाराष्ट्रातील हजारो खव्यांच्या पसंतीला पडलेली,आणि खाद्य संस्कृतीत स्वतःची हुकमत गाजवणा-या मावळ तालुक्यातील वडगाव मावळ येथील हाॅटेल शिवराजची दुसरी शाखा ग्राहकांच्या सेवेला तत्पर झाली आहे.आप्तस्वकीय आणि मित्र मंडळींच्या उपस्थितीत दुस-या शाखेचे छोटेखानी उद्घाटन करण्यात आले. ही दुसरी शाखा पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर कान्हे फाटा येथे ओम नम: शिवाय मंगल कार्यालया जवळ सुरू करण्यात आली आहे.
वडगाव मावळ येथील युवा उद्योजक अतुल वायकर यांनी आठ वर्षापूर्वी हाॅटेल व्यवसायात पदार्पण केले.शिवराज खाद्य संस्कृतीतील केवळ नाव,न राहता हा ब्रॅण्ड महाराष्ट्रातील घराघरात पोहचला पाहिजे म्हणून हा तरूण राबला. याने कष्ट केले. शाकाहारी व मांसाहारी थाळीतून ग्राहकांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि तो यात यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील राहिला. या प्रयत्नाला साथही मिळाली. आणि शिवराज ब्रॅण्ड दिवसेंदिवस लोकप्रिय होऊ लागला.
आठ वर्षातील या दुस-या शाखेचे उद्घाटन अतुल चे वडील खंडू आबाजी वायकर, कृषी व पशुसंवर्धनचे सभापती बाबूराव वायकर,भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष रामनाथ वारींगे , तळेगाव येथील उद्योजक विलासशेठ काळोखे, खादी ग्रामोद्योगचे उपाध्यक्ष दत्तात्रय शिंदे, उद्योजक श्रीकांत वायकर, युवा उद्योजक प्रसाद वारींगे, विकास सातकर,सागर आगळमे,रमेश भुरूक आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत दुस-या शाखेचा छोटेखानी समारंभ पार पडला.
उद्घाटनापासून आषाढी अमावस्या पर्यत शिवराज आपल्या ग्राहकांना सात टक्के डिस्काउंट देणार आहे. येथेही आपल्याला पहिल्या शाखे प्रमाणेच रावण थाळी, बुलेट थाळी, बकासूर थाळी,सरकार थाळी याचा आस्वाद घेता येणार आहे. नव्या शाखेच्या लाॅचिंगला महिलांसाठी खास’ पैठणी थाळी ‘ सुरू करण्यात आली आहे. या थाळीची चव चाखायला आणि मेनू न्याहाळला आपल्या आजच या नव्या दालनात यायला हवे.
पैठणी थाळीचा आस्वाद घेता घेता आपणही पैठणीच्या मानकरी होऊ शकता. शिवराज ने पैठणी लकी ड्रॉ योजना ठेवली आहे. ज्यात पहिल्या तीन क्रमांकाला अनुक्रमे येवला पैठणी,सोन्याची नथ,चांदीचा छल्ला अशी बक्षीसे आहेत. शिवाय सहभागी होणा-याला आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. लहान लेकरे सोबत असतील तर काळजी करू नका,कार्टून त्यांच्या स्वागताला असतील. फॅमिली साठी स्वतंत्र व्यवस्था आहे.येथे तुम्हाला राहता येणार आहे. शिवराज हाॅटेल च्या दुसरी शाखा आपल्या स्वागताला तत्पर व सज्ज आहे. शिवराजचे अतूल वायकर,प्रसाद वारींगे, श्रीकांत वायकर, मयूर काळोखे,अक्षय वारींगे यांनी स्वागत केले.

error: Content is protected !!