वडगाव मावळ: सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र पुरस्कृत सह्याद्री विद्यार्थी अकादमी मावळ तालुका विभागातर्फे रक्षाबंधनाच्या निमित्ताने बंधुप्रेमाचे म्हणून सीमेवर लढणाऱ्या जवानांना व कोरोना च्या काळात मदत करण्याऱ्या पोलीस बांधव व ग्रामपंचायत कर्मचारी याना राखी बांधून हा सण साजरा करण्याचे ठरवले आहे.अकादमीमार्फत दरवेळी स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविले जातात. अकादमीच्या वतीने आत्तापर्यंत कोरोना काळातही अनेक गरीब गरजू नागरिकांची सेवा करण्यात आली आहे.आपल्या देशाच्या रक्षणार्थ उभे असणाऱ्या सैनिकांच्या विषयी आदरार्थी व करोना च्या काळात आपल्या पाठिशी उभी राहिलेली पोलीस बांधव व कर्मचारी याना सलाम करून आपले सण जोपासण्यासाचा सह्याद्री परिवाराचा हेतू असल्याचे सह्यादी विद्यार्थी अकादमी चे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख चेतन वाघमारे यांनी सांगितले.ज्यांना कोणाला या कार्यात सहभागी व्हायचे असेल, आपली राखी पाठवायची असेल त्यांनी २५ जुलै पर्यंत आपल्या राख्या अकादमी सदस्याकडे सुपूर्त कराव्यात. असे आवाहन अकादमी च्या वतीने करण्यात आले आहेअ सह्याद्री अकादमीचे सदस्य चेतन वाघमारे किरण ढोरे  अनिकेत आंबेकर निलेश ठाकर विशाल सुरतवाला किशोर वाघमारे यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!