वडगाव मावळ:
कोरोनाच्या संकटात लसीकरण हे सुरक्षारक्षक कवच आहे.त्यामुळे नागरिकांनी सुरक्षा कवच घेतले तरी गाफील न राहता आरोग्य विभागाने दिलेल्या सुचनांचे आणि नियमांचे पालन करावे असे आवाहन पंचायत समितीचे माजी उपसभापती शांताराम कदम यांनी केले.
निगडे येथे आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरण सुरू करण्यात आले. यावेळी कदम यांनी हे आवाहन केले.
पंचायत समिती सदस्य शांताराम बापू कदम , आदर्श सरपंच सविता भांगरे, उपसरपंच रामदास चव्हाण ,ग्रामपंचायत सदस्य गणेश भांगरे,मीरा भांगरे,पोलीस पाटील संतोष भागवत,शालेय समिती अध्यक्ष अर्चना भांगरे,सदस्य शीतल भांगरे,डॉ.ऐश्वर्या ठोंबरे,डॉ जयेश बिरारी
मृदुला देवकुलकर ,वैभव आखाडे,चोरघे सर,आशासेविक योगिता शेजवळ,सामाजिक कार्यकर्ते बबूशा भांगरे,सागर यादव,शांताराम शेजवळ,तानाजी येवले,राजू पानसरे,मंथन भांगरे ग्रामसेवक शशिकीरन जाधव
आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
सरपंच सविता भांगरे म्हणाल्या,” वाहने नसल्याने गावातील वयोवृद्ध नागरिकांनी लसीकरण साठी शहरात जायचे कसे हा मोठा प्रश्न होता. शिवाय लसीकरणासाठी सकाळी लवकरच रांगेत थांबावे लागायचे. टोकन संपले की, माघारी परत यावे लागत होते. आता गावातच लसीकरण सुरू झाल्याने लसीकरणासाठी मोठा प्रतिसाद मिळत आहे.लसीकरण झालेल्या गावक-यांनी नियमित मास्कचा वापर करावा. तसेच हात धुवावे. सॅनिटायझरचा वापर करावा.
गावातच लसीकरणाची सोय झाल्याने नागरिकांची गैरसोय टळली असल्याची प्रतिक्रिया बबूशा भांगरे यांनी दिली.

error: Content is protected !!