तळेगाव दाभाडे : वराळे फाटा येथील चौकात रस्ता खुप खराब झाला होता. जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे यांनी वराळे फाटा रस्ता दुरुस्तीची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गेल्या दिड वर्षांपासून वारंवार केली. मात्र कागदी घोडे नाचवत लवकर कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले.ग्रामपंचायतीने देखिल या बाबतीत पत्र व्यवहार केले. मात्र रस्त्याला निधी उपलब्ध झाला नाही. तर यात मावळात पडणाऱ्या जोरदार पावसामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणे कठिण झाले वाहन चालवताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत होती.नागरिकांना प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे त्रास होत असल्याने व अधिकारी फंड उपलब्ध करून देत नसल्याने जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे यांनी स्वखर्चातुन ते काम करण्याचे ठरवले.
यासाठी सहा लाख रुपये निधी खर्च करून फुट लांब व २४ फुट रूंद) रस्त्याचे कॉक्रीटीकरण काम आज प्रत्यक्ष सुरु केले. यामुळे नागरिकांनी जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे यांच्या कामाचे कौतुक केले आहे. जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे म्हणाले,” गेल्या दिड वर्षापासून वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला. मात्र त्यांच्या भरवश्यावर रस्ता वेळेत होईल अशी अपेक्षा संपली होती. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्याने यावर जिल्हा परिषद सदस्याला निधी देता येत नाही. एखादा मोठा अपघात होऊन एखाद्याच्या जीवावर बेतले, तर काय होईल ? शिवाय वृध्द नागरिक, महिला यांना या खराब रस्त्यामुळे खुप त्रास सहन करावा लागत होता. यामुळे मी स्वखर्चाने रस्ता करण्याचा निर्णय घेतला.

error: Content is protected !!