वडगाव मावळ: मावळात पावसाने अक्षरशः थैमान घातले असून मावळ तालुक्यात अनेक वाड्या वस्त्यांवर पुरस्तिथी निर्माण झाली आहे. अनेकांच्या शेतातील पिके वाहुन गेली, शेताचे बांध फुटुन गेले, अनेकांच्या घरात पाणी शिरले त्यामुळे अनेकांचे संसार डळमळीत झाले. नद्यांना पुर आले. त्यामुळे जनजीवन सर्वत्र विस्कळीत झाले.
अशा परिस्थितीत बजरंग दल सारखी संघटना अनेकांना मदतीचा हात देत पुढे सरसावली. समाज्यातील विविध स्तरातून बजरंग दलच्या कार्यकर्त्यांना फोन येवु लागले. त्यात तुंग येथे जमिनीला ३०० मीटरवर भूस्खलन झाले. मोठे भगदाड पडले. तसेच या भागात अतिवृष्टी झाल्याने तुंग येथील रहिवासी सिताराम पाठारे यांच्या किराणा मालाच्या दुकाणावर व घरावर दरड कोसळली.
त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले, सुदैवाने जिवित हानी झाली नाही. पण वास्तु पुर्णपणे उध्वस्त झाली व दुकानातील मालाची पुर्ण नासधुस झाली. यावेळी पाठारे कुटुंबाला भेटुन धिर देवुन सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन बजरंग दलाकडून देण्यात आले. 
“सेवा है यज्ञ कुंड समिधा सम हम जले’ ध्येय महासागर में सरित रूप हम मिले” असे म्हणत तळागाळातील प्रत्येक कार्यकर्ता या पुर परिस्थितीत पुढे सरसावला. 
तुंग येथील निराधार महीला कातकरी बांधव यांना शिधा किट देऊन त्यांची आस्थेन चौकशी करत प्रत्येक कुटुंबाच्या घरांची पाहणी केली. तुंग गावातील निराधार आजी सुभद्राबाई दामू  पाठारे यांचे घर या मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे पडले.
त्यांना राहण्या योग्य जागा नाही, सगळीकडे पाणीच पाणी, पडके घर, मुल बाळ नाही, निट कानाने ऐकायला येत नाही, कि  डोळ्याने दिसत नाही. वय वर्षे ७५ च्या पुढे. असे असताना खुप या आजी वर बिकट परिस्थिती ओढावली. तरी या आजीला सर्वोतोपरी मदत करावी असे आवाहन बजरंग दलाच्या माध्यमातून समाज बांधवांना करण्यात आले. 
यावेळी बजरंग दल विभाग संयोजक संदेश भेगडे, जिल्हा सह संयोजक बाळासाहेब खांडभोर, राजेंद्र घायाळ, सुभाष भोते, निलेश ठाकर, सचिन ठोंबरे, सुनील ठोंबरे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!