पवनानगर:  मावळ तालुक्‍यात गेल्या चार- पाच दिवसा पुर्वी झालेल्या मुसळधार पाऊसामुळे पवना धरणाच्या पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली असून पवना धरणात ८०.७३ टक्के पाणीसाठा झाला आहे .
कालपासूनच मावळात पाऊसाचा जोर ओसरला असुन अधूनमधून पाऊसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत . पवासाचे प्रमाण कमी झाल्याने नदी, नाले, भातखाचरे,ओहळा यांच्या मधील पाणी ओसरले आहे.मावळ तालुक्यासह पिपंरी चिंचवडकरांची पाण्याचे मुख्यस्त्रोत असेलेल्या पवनाधरण ८० टक्के भरले असल्याने मावळसह पिंपरींचिचंवड शहरवासियांची वर्षाभराची पिण्याच्या पाण्याची चिंती मिटली आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहेगेल्या काही दिवसापासुन धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पाणीसाठ्या चांगलीचं वाढ होत आहे. सुरुवातीला जुन मध्ये च‍ांगला पाऊस झाला मात्र त्यांनतर पाऊसाने दडी मारल्याने धरणाची पाणीपातळी कमी झाली होती. मात्र, सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पवना धरणाच्या पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे.आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत पवना धरणात ८०.७३ टक्के पाणीसाठा झाला आहे.तर आज दिवसभरात धरण परिसरात फक्त ११ मिलीमीटर पाऊसाची नोंद झाली असून परिसरात आत्तापर्यंत १६५३ मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे. 
तर मागील वर्षी आजमितीला ४९६ मीमी पाऊस झाला होता.तर पवना धरणात ३५ टक्के एवढा पाणी साठा शिल्लक होता. तर १ जुन पासुन पाणीसाठ्यात ४६ टक्के एवढी वाढ झाली आहे. अशी माहिती पाटबंधारे विभागकडुन देण्यात आली आहे
मागील वर्षाच्या तुलनेत पवना धरणात यावर्षी तिप्पट पाऊस झाला आहे.

error: Content is protected !!