गोंदिया : 
राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात ५० हजार रुपये प्रोत्साहन राशी टाकण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
नाना पटोले म्हणाले, थकीत कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी महाविकास आघाडीने पुढाकार घेतला होता. त्या सोबतच कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये याची देखील खबरदारी घेण्यात आली. अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याकरता सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती.

error: Content is protected !!