कामशेत:
कुसगाव खुर्द येथे खाणीत बुडून वडील व दोन मुलांचा मृत्यू झाला. पिराजी गणपती सुळे (वय ४५) ,साईनाथ पिराजी सुळे( वय १४),सचिन पिराजी सुळे (वय ११)
रा.इंद्रायणी काॅलनी कामशेत, मुळगाव नायगाव वाडी जि.नांदेड , अशी मृत्यू पावलेल्या बापलेकांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार,सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पिराजी दोन्ही लेकरांना घेऊन कुसगाव खुर्द येथील धबधबे पहायला गेला होता. धबधब्याच्या पायथ्याशी उत्खनन केलेल्या जागे पाण्याचे मोठे डबके साचले आहे. या डब्यात दोन मुले बुडू लागल्याने त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात पिराजी याचाही बुडून मृत्यू झाला.
जवळचे जनावरे राखणा-या एका शेतकऱ्याने यांना बुडताना पाहिले आणि आरडाओरड करून गावकरी गोळा झाले. त्यांना चिखलाच्या दलदलीतून बाहेर काढले असता जागेवरच त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

error: Content is protected !!