टाकवे बुद्रुक:
मंगरूळ जवळील आंद्रा धरण शंभर टक्के भरले असून सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग होऊ लागला आहे. पावसाचा जोर कायम होता.त्यामुळे शुक्रवारी दि.२३ जुलैला दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास साड्यांवरून पाण्याचा विसर्ग सुरू झाला.
बुधवारी २१जुलैला हे धरण ७७.५३ टक्के भरले होते. आता धरण शंभर टक्के भरले आहे.अवघ्या दोन दिवसात धरणांच्या २२.४७ टक्के पाणी साठ्यात वाढ झाली. आज सांडव्यावरून ११९६ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदी काठच्या गावानी सतर्क रहावे असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले.
आज धरणातील जलाशय पातळी ६१४ मीटर असून एकुण साठा ८३.३० दशलक्षघनमीटर व उपयुक्त साठा ८२.७४ दशलक्षघनमीटर असा आहे. आज दिवसभरात ४३ मिलीमीटर पाऊस पडण्याची नोंद झाली आहे.आतापर्यंत एकुण पाउस ७३४ मिलीमीटर पाऊस झाल्याची माहिती शाखा अभियंता मनोहर खाडे व उमेश यादव यांनी ही माहीती दिली.

error: Content is protected !!