मावळमित्र न्यूज: सह्याद्री च्या डोंगर रांगातील आंदर मावळ च्या पश्चिम पट्टयातील कांब्रे(आं.मा) गावच्या धबधबे आणि निसर्गरम्य परिसर असणाऱ्या डोंगररांगेच्या मध्यभागात कोरलेली,मातीचं बांधकाम असलेली ऐतिहासिक लेणी अनेक पर्यटक आणि इतिहास प्रेमीं चे लक्ष वेधत आहे.
लेणीची वैशिष्ट्ये: ●कांब्रे(आं.मावळ) येथील डोंगरात पूर्वदर्शनी लेणी आहे.डोंगराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी डोंगरात लेणी कोरलेली आहे. ●लेणी मध्ये पाणी साठवणीसाठी मोठ-मोठ्या टाक्या कोरण्यात आल्या आहेत त्याच बरोबर झोपाळे टांगण्यासाठी अनेक खोबण्या कोरण्यात आलेल्या आहेत. ●या लेणी मध्ये ध्यान साधनेसाठी किंवा राहण्यासाठी अंतर्गत खोल्या कोरल्या आहेत.लेणी चं बांधकाम दगड-मातीचं आहे तर चौकटी, दरवाजे आणि खुंट्या यांसाठी लाकडाचा वापर केला आहे. ●लेणीं च्या मध्यभागात भलं मोठं कोरीव उखळ,सारीपाट चा डाव आखलेला आहे.लेणीच्या मुख्य भागात जाण्यासाठी सुंदर असा कोरीव पायऱ्यांचा भुयारी मार्ग बनवला असून हा मार्ग सुरक्षिततेसाठी या मार्गाच्या सुरुवातीला अरुंद असा कवाडी दरवाजा बसविला असावा अशा काहीशा खुणा शिल्लक आहेत. ●या लेणीं मधून आंध्रा धरणाच्या बॅक वॉटर चा भाग, बाजूची गावं,वाड्या-वस्त्या अतिशय सुंदररीत्या न्याहाळता येतात.इतिहासकार आणि जाणकारांच्या मते कुसुर घाट मार्ग आणि मावळच्या आंदर भागावर नजर ठेवण्यासाठी या लेणीच्या उपयोग केला जात असावा. ●पर्यटक,इतिहासप्रेमी,जाणकार मंडळी, शिवभक्तांनो मावळ भागातील पर्यटन स्थळांना भेटी देताना या ऐतिहासिक लेणीं ला नक्कीच भेट द्या. ●या लेणीचा जवळ-जवळ निम्याहून अधिक भाग दुर्लक्षित असल्याने ढासळून गेला आहे तर काही भाग,भिंती ढासळण्याच्या मार्गावर आहे. खरंतर प्रशासने या भव्य ऐतिहासिक वारसाचे जतन आणि संवर्धन करणं गरजेचं आहे. अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ यांच्याकडून नेहमीच होत असते. माय-बाप सरकार आणि पर्यटन विभागाने या अनमोल ऐतिहासिक ठेव्याची शासकीय दरबारी नोंद घेऊन जतन आणि संवर्धनाबद्दल दक्षता घ्यावी.( शब्दांकन- सुभाष आलम-देशमुख गडकल्याण प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य.)

error: Content is protected !!