पुणे :
हॉटेल अशोकाच्या मालकानेच सराईत गुन्हेगार असलेल्या भाच्याला हॉटेल गारवाचे मालक आखाडेंच्या खुनाची सुपारी दिली. गारवा हॉटेलमुळे अशोका हॉटेल चालत नव्हते. यामुळेच ही सुपारी दिली गेल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे.
गारवाचा रोजचा गल्ला दोन लाखाच्या पुढे तर अशोकाचा साधारण पन्नास हजार रुपये होत. गारवा बंद असते त्या दिवशी अशोकाचा व्यवसाय अडीच ते तीन लाख रुपयांचा होत असे. त्यामुळे गारवा कायमचे बंद पडले तर आपला व्यवसाय वाढेल या विचाराने आरोपींनी खुनाचा कट केल्याचे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये नमूद आहे.

error: Content is protected !!