शिक्रापूर : अवघ्या ३२ विद्यार्थी पटसंख्येवर २०१२ साली सुरू झालेल्या शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांसह दोन सह शिक्षिकांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. ग्रामस्थांच्या पुढाकारातून नऊ वर्षांत शाळेचा पट ५१४ पर्यंत पोहचला होता. देशविदेशातील नामांकित शाळांसोबत सामंजस्य करार करून अभिनव शिक्षणपद्धती विकसित केलेल्या या शाळेचे मुख्याध्यापक, राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक दत्तात्रेय वाबळे यांनी मुख्याध्यापक पद आणि शासकीय सेवेचा आज (ता. २२ जुलै) तडकाफडकी राजीनामा दिला. त्यांच्यासमवेत त्यांचे सहकारी शिक्षक एकनाथ खैरे, केंदूर (ता. शिरूर) येथील मुख्याध्यापक जयसिंग नऱ्हे यांनी राजीनामा दिला आहे.

error: Content is protected !!