वडगाव मावळ:
तळेगाव दाभाडे औद्योगिक वसाहत टप्पा क्रमांक चार साठी निगडे,आंबळे,कल्हाट,पवळेवाडी येथे सहा हजार एकर जमीन संपादनाची प्रकिया सुरू आहे. यासाठी शासन स्तरावरची कार्यवाही अंतिम टप्प्यात आली आहे.
स्थानिक शेतकऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
मात्र निगडे व कल्हाट येथील इको सेन्सिटिव्ह झोन मुळे औद्योगिक विकासाबाबत अडथळा येत आहे ही बाब मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिली. आमदार सुनिल शेळके यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीतील ६ जनपथ या निवासस्थानी पवारांची भेट घेतली .आणि मावळ तालुक्यातील विकासाचा आढावा दिला.
तसेच तळेगाव दाभाडे एमआयडीसी टप्पा क्रमांक चार मधील विस्ताराच्या त्रुटी पवारांच्या निदर्शनास आणून दिल्या. मावळ तालुक्यातील विकासकामांची सद्यस्थिती व प्रलंबित असणारी कामे याबाबत सविस्तर माहिती दिली.
औद्योगिक क्षेत्र टप्पा क्रमांक चारला मान्यता मिळालेली आहे.परंतु इको सेन्सिटिव्ह झोन असल्यामुळे एमआयडीसीचा विस्तार करण्यास अडचणी येत आहेत.त्यामुळे आपण संबंधित अधिकाऱ्यांना सूचना कराव्यात,अशी विनंती आमदार शेळके यांनी पवारांना केली.

error: Content is protected !!