पवनानगर:
पवन मावळातील पश्चिम भागात चारसूत्री पद्धतीने भात लावणी केली जात आहे. पारंपारिक पद्धतीला छेद नव्या तंत्राचा वापर केला जात आहे.
शिळींब येथे चारसूत्री भात लागवड जोरात सुरू आहे. मावळ तालुक्यातील पवन मावळ हे भाताचे कोठार समजले जाते शिळींब हे डोंगर ,दऱ्या मध्ये निर्सगाच्या सानिध्यात वसलेले गाव इथे आजमितीस शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत.
बऱ्याच दिवसा पासून शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत होते. परंतु आता पाऊस सुरु झाल्याने शेतकऱ्यांनी भात लागवड चालू केल्या आहेत शिळींब गावातील प्रगतशील शेतकरी संतोष किसन कडू यांच्या शेतात चारसूत्री पद्धतीने भात लागवड कृषी सहायक कृषी अधिकारी विकास गोसावी व कृषी मित्र लहू धनवे यांच्या मार्गदर्शना खाली एक एकर क्षेत्रावर चारसूत्री पद्धतीने भात लागवड करण्यात आली .
पाऊस चालू झाल्याने व भात रोपे २५ दिवसाची झाल्याने भात लागवड दोरीच्या साह्याने १५ बाय २५ सेंमी अंतरावर चारसूत्री पद्धतीने भात लागवड केली. त्यांनी एक एकर क्षेत्रासाठी इंद्रायणी जातीचे दहा किलो बियाने बिजप्रक्रिया करून रोपवाटिकेवर भात रोपे तयार केली व योग्य वयाच्या रोपाची लागवड केली व नंतर यूरिया ब्रिकेट ची गोळ्या चार चूडाच्या मधे एक गोळी अशा प्रकारे लागवडी नंतर दोन ते तीन दिवसात लावनार असल्याचे सांगितले. त्यामुळे भाताच्या उत्पादनात वाढ होणार आहे. कोरोना महामारी मूळे मजराचा तुटवडा ह्यांमुळे लोक आधुनिक लागवडीकडे वळले आहेत ह्या वर्षी बहुसंख्य शेतकरी चारसुत्री ,यांत्रिक पध्दतीने लागवड करत आहेत. शिळींब ,मोरवे ,चावसर या गावात शंभर एकर वर चारसूत्री भात लागवड करणार असल्याचे कृषिसहायक विकास गोसावी यांनी सांगितले.
शिळींब गावात संभाजी कडू ,लहू धनवे ,अशोक केदारी , संतोष जगताप ,सचिन जगताप ,संदीप बिडकर (पोलीस पाटील),अंकुश ओव्हाळ ,दिनेश ओव्हाळ ,आनंदा ओव्हाळ ,राहुल जगताप ,संतोष कुंभार ,शेखर जगताप ,नंदू धनवे इ असे बहुसंख्य शेतकरी चारसूत्री पद्धतीने भात लागवड करत आहेत.

error: Content is protected !!