पंढरपूर :
आषाढी एकादशी निमित्त मंगळवारी पहाटे श्री विठ्ठल – रुक्‍मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्‍मी ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आली. रश्मी ठाकरे यांनी रूख्मिणी मातेची खणानारळाने ओटी भरली.
मंदिरातील विणेकरी केशव कोलते आणि त्यांच्या पत्नी इंदूबाई यांना ठाकरे दांपत्य यांच्या समवेत वारकरी प्रतिनिधी म्हणून महापूजा करण्याचा मान मिळाला. महापूजेच्या नंतर मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे तसेच वारकरी प्रतिनिधीचा मान मिळालेल्या कोलते दांपत्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे आदि उपस्थित होते.
भक्तीचा महापुर असलेला आणि वारकऱ्यांच्या ओतप्रोत भक्तीने चिंब झालेली पंढरी नगरी पहायची असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विठुरायाच्या चरणी घालून कोरोना मुक्तीची प्रार्थना केली. रश्मी ठाकरे यांनी रूख्मिणी मातेची खणानारळाने ओटी भरली.
शासकीय पूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भर पावसात स्वतःच कार चालवित पंढरपुरात पोहोचले. येथे पोहचल्यावर त्यांनी शासकीय अधिकाऱ्यां समवेत कोरोना आढावाची बैठक घेतली.

error: Content is protected !!