सोमाटणे : पवनमावळातील डोणे या गावांत सरदार श्रीमंत विठोजी कारके यांच्या जन्मगांवी सिंहगड विजयी दिन साजरा करण्यात आला. सरदार विठोजी कारके व सरदार नावजी बलकवडे यांना छञपती राजारामराजे यांनी सिंहगड स्वराज्यात आणण्यांची जबाबदारी सोपवली. तेव्हा ०१जुलै १६९३ रोजी सरदार विठोजी कारके व सरदार नावजी बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली सिंहगड स्वराजात आणला. त्यानिमित्त शिवव्याख्याते श्री अजितराव काळोखे यांचे व्याख्यान झाले .त्यांनी डोणे गांवचा अज्ञात असलेल्या इतिहास गावक-यां समोर मांडला.त्यावेळी गावक-यांचा ऊर अभिमानाने भरून आला. कोरोना१९ च्या जागतिक महामारीमुळे या छोटखानी कार्यक्रमामध्ये प्रथमतः शिवप्रतिमेचे पुजन करण्यात आले.नंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश कारके ,राज्य कर निरीक्षक दिनेश कारके ,तालुका राष्ट्रवादीचे मा.अध्यक्ष संजय कारके,सरपंच शिवलिंग कुभांर,शिवव्याख्याते अजितराव काळोखे ,अध्यक्ष योगेश कारके ,एकता प्रतिष्ठाणचे उपाध्यक्ष रविंद्र काळभोर ,संस्थापक- बाळासाहेब घारे ,दिपक कारके, उद्योजक ऋषीकेश कारके ,राहुल घारे,संतोष कारके यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमाचे सुञसंचालन एकता प्रतिष्ठाणचे अध्यक्ष योगेश कारके यांनी केले,प्रास्ताविक सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश कारके व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष संजय कारके यांनी केले, व आभार एकता प्रतिष्ठाणचे संस्थापक- बाळासाहेब घारे यांनी मानले.याप्रसंगी उपस्थितामध्ये नारायण कारके,दत्ता कारके.गणेश छ. कारके ,विजय कारके , शेखर काळभोर ,समिर खिलारी ,उमेश दत्तु कारके रणजित खिलारी ,विश्वास चांदेकर तसेच डोणे ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!