वडगांव मावळ:
कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी महिलांनी व्यवसायात ठामपणे उभे राहून गरूडझेप घ्यावी असे आवाहन आमदार सुनिल शेळके यांच्या पत्नी सारीका सुनिल शेळके यांनी केले.
वडेश्वर येथील’ ऐश्वर्या क्रियशन ‘लेडीज शाॅपीचे उद्घाटन सारीका शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.त्या वेळी शेळके बोलत होत्या.
महिलांच्या साठी खास ‘ऐश्वर्या क्रियशन’ लेडीज शॉपी हे दालन उघडले आहे. पंचक्रोशीतील महिलांसाठी अगदी माफक व योग्य दरात वस्तूची विक्री करणार असल्याचा दावा शुभांगी दरेकर यांनी केला.शुभांगी बबन दरेकर या ही शॉपी चालवत आहेत.
सारिका शेळके म्हणाल्या,” महिलांनी अशा व्यवसायात उतरावे व स्वबळावर उभे राहावे .वडेश्वर सारख्या ग्रामीण ठिकाणीं महिलांना चांगले दर्जाचे व विविध कपडे ,साड्या, ड्रेस उपलब्ध होत आहेत .महिलांनी याचा फायदा करून घ्यावा.
यावेळी सुकन्या आंबेकर, वैशाली शिंदे,रेश्मा शेळके, रुपाली दरेकर, मनीषा दरेकर,संगीता शिंदे, छाया हेमाडे,दत्तात्रय पडवळ ,अमित कुंभार,चंद्रकांत कुंभार, शिवाजी कुंभार, गणेश लष्करी,चंद्रकांत जामदार,उपस्थित होते. डोंगरी विभाग विकास समितीच्या सदस्या शुभांगी दरेकर यांनी स्वागत केले.

error: Content is protected !!