वजन घटवायला आणि चरबी कमी करायला आयुर्वेदातील काही उपाय उपयुक्त ठरू शकतील. ते उपाय समजून पाहूया.
● आयुर्वेदिक उपाय
मेथीचे सेवन
मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवून सकाळी रिकाम्या पोटी त्याचे सेवन करू शकतो.
त्रिफळा चूर्ण
त्रिफळा आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढते. पचनतंत्र आरोग्यपूर्ण ठेवते. यासाठी आपण रात्रीच्या जेवणानंतर दोन तासांनी एक चमचा त्रिफळा चूर्ण गरम पाण्यासोबत घेऊ शकतो.
चावून चावून घ्या आहार
कार्बोहायड्रेट्सच्या पचनाला तोंडातच सुरुवात होते. तोंडातील लाळ त्याच्यासोबत मिसळते. त्यामुळे अन्न चावून खाणे महत्त्वाचे.
गरम पाणी प्या
तहान लागल्यावर गरम पाणी प्या. यामुळे आपले पाचनतंत्र सक्रीय होते आणि चरबी कमी करण्यास मदत मिळते.
ब्रिस्क वॉक करा
एक तास वॉक केल्याने आपल्या पोटाचा भाग मजबूत होईल. वेगाने चालल्यामुळे पोटाची चरबही कमी होईल. तसेच आपण यासाठी योगा आणि पिलेट्सही करू शकता.
आयुर्वेदिक औषधे उपयुक्त
आयुर्वेदिक औषधे जेव्हा योग्य आहार आणि व्यायामासोबत घेतली जातात तेव्हा त्यांचाही वापर अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी होतो. उद्वर्तन हा आयुर्वेदातील लोकप्रिय वजन कमी करण्याचा उपाय आहे. यामुळे सेल्यूलाईटही कमी होतात. आपल्या आयुर्वेदिक सल्लागाराशी बोलून आपण याचा वापर करू शकता.
आल्याचा आहारात समावेश
वाळलेले आले किंवा सुंठपुडीत थर्मोजेनिक एजंट असतो. जो चरबीचे ज्वलन करण्यात उपयुक्त असतो. सुंठपुडीसोबत उकळलेले पाणी नियमित घेतल्याने आपले पचनतंत्र सुधारते आणि वजन कमी होते. तसेच आपल्या रोजच्या आहारातही आपण आल्याचा समावेश करू शकता.
गार्सिनिया कँबोगियाचे सेवन
आयुर्वेदानुसार असंतुलित कफदोष मेधा धातूच्या वाढीला कारणीभूत ठरतो ज्यामुळे वजन वाढते. गार्सिनिया कँबोगिया कफदोष संतुलित करतो ज्यामुळे वजन कमी करण्यासाठी याचा सल्ला दिला जातो. गार्सिनिया कँबोगिया चव वाढवतो, पाचनतंत्र सुधारतो आणि त्याचा वेग वाढवतो. हे फळ आपल्या आहारात सामील केल्यामुळे वजन वेगाने कमी होते.

error: Content is protected !!