पवनानगर: मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विद्यार्थी संघटनेच्या उपाध्यक्षपदी राहुल लक्ष्मण मोहोळ यांची निवड पक्षाचे विद्यार्थी तालुका अध्यक्ष नवनाथ चोपडे यांनी जाहीर केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यार्थी चे अध्यक्ष नवनाथ चोपडे,
पै दिलीप दादा राक्षे , राजेश दादा वाघोले ,पवन मावळ राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस अध्यक्ष प्रमोद ठाकर ,पै अमित ठाकर ,राहुल पोटफोडे आक्षय तुपे,मंगेश म्हस्के , दत्ता भाऊ खिलारे , ताराचंद वाळुंजकर , किरण करवंदे, शक्ती कालेकार, अमर कदम, रोहित उर्फ बाळा पांडे उपस्थित होते.
राहूल मोहोळ यांना शालेय दशेपासूनच नेतृत्व करण्याची आवड होती मोहोळ यांनी पवन मावळ विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेचे सरचिटणीस अशा विविध पदांवर कार्य केले असुन ग्रामीण भागातील विद्यार्थी व तरुणांमध्ये त्यांचा दांडगा संपर्क आहे तसेच तरूणांना एकत्र करण्याचे संघटन कौशल्य चांगले असल्याने त्यांच्यावर तालुक्याची जबाबदारी देण्यात आली आहे
यावेळी बोलताना मोहोळ म्हणाले की, तालुक्यातील विद्यार्थ्यांना येणाऱ्या शैक्षणिक अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील.

error: Content is protected !!