

वडगाव मावळ:
तालुक्याच्या विकासासाठी आमदार सुनिल शेळके यांनी ५१ कोटी ४० लक्ष निधी उपलब्ध केल्याबद्दल मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला काँग्रेस च्या वतीने सत्कार करण्यात आला. आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रक देण्यात आले.
मनिषा गरुड यांची कामशेत शहराध्यक्ष पदी,कल्याणी विजय काजळे यांची खजिनदार,सिंधुताई अनिल मुर्हे यांची ऊर्से गण अध्यक्षपदी,रुपाली दिनेश काजळे यांची वडगाव खडकाळा उपाध्यक्ष पदी,उर्मिला शामराव धामणकर यांची उर्से गण अध्यक्ष पदी, बेबीताई ढमाले यांची चांदखेड उपाध्यक्ष पदी,रंजनाताई दिनकर सातकर यांची-वडगाव-गण अध्यक्ष पदी ,सविता चेतन सांगळे यांची वडगाव कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
आमदार सुनील शेळके, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री बबनराव भेगडे, मावळ तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुवर्णा राऊत,मावळ तालुका ग्रामीण ब्लॉकचे अध्यक्ष सुभाष जाधव, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विठ्ठलराव शिंदे उपस्थित होते.


