वडगाव मावळ:
राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रवक्ते विकास लावंड यांनी पत्रकार परिषदेत भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर केलेले आरोप म्हणजे शिळ्या कढीला ऊत आणण्याचा हास्यास्पद प्रकार आहे.
वस्तूत: तीन वर्षपूर्वीच सदर प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता . त्यास तत्कालीन महसूल मंत्री म्हणून चंद्रकांतदादा पाटील यांनी उत्तर दिले व सर्व शंकाचे निरसन केले होते.
आता तीन वर्षांनी या प्रकरणावर पुन्हा चौकशीची मागणी करणे हे शिळ्या कढीला ऊत आणण्याचा हास्यस्पद प्रकार असून महाविकास आघाडी चे मंत्री विविध प्रकरणात सप्रमाण अडकत असल्याने त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी हा बिनबुडाचा आरोप करण्यात येत आहे असे भाजप चे नेते माजी मंत्री बाळा भेगडे म्हणाले.
आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी अजितदादा पवार यांच्यावर आरोप केल्याने त्यांच्यावरील निष्ठा दाखविण्यासाठी लावंड यांची केविलवाणी धडपड सुरु असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. ह्या प्रकरणात काही तथ्य असते तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी ने सत्तेत येऊन दीड वर्षे झाल्यानंतर हा आरोप केल्याने त्यातील फोलपणा उघड होतो.
जर ह्या विषयात काही काळंबेरं असते तर यापूर्वीच सरकार ने चौकशी केली असती, तरीही या प्रकरणात कोणत्याही प्रकारच्या चौकशीस सामोरे जाण्याची आमची तयारी असून ती अवश्य करावी असे प्रती आव्हान ही देत आहोत असेही श्री. भेगडे म्हणाले.

error: Content is protected !!