मावळ: मावळ लोकसभा मतदारसंघातील खासदार श्रीरंग बारणे यांनी कोरोना जागतिक महामारी काळात केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेण्यात आली आहे.
खासदार श्रीरंग बारणे यांची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन मध्ये नोंद झाली आहे. जवळपास दीड वर्षाहून अधिक काळ कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेपासून ते दुसरी लाट या संकंट परिस्थितीमध्ये मावळ लोकसभा मतदारसंघात कोरोनाचे संक्रमण काळात कोरोना बाधित रुग्णांना स्थानिक पातळीवर आणि वेळेत उपचार व्हावेत. यासाठी मतदारसंघात वेळोवेळी बैठका घेऊन केलेली मदत.कोविड रुग्णालय उभारण्यासाठी घेतलेला पुढाकार.हातवर पोट असलेल्या नागरिकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहत त्यांना केलेली मदत,अन्न धान्य वाटप कोवीड हॅास्पिलसाठी साहित्याची मदत,कोवीड रूग्णांचे बील कमी करण्यासाठी प्रयत्न या सर्व कार्यांची दखल घेत वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन वतीने प्रमाणपत्र देत केलेल्या कार्याबद्दल माझा गौरव केला.
हा पुरस्कार मी सर्व कोविड योध्दा ना समर्पित करत आहे व माझ्या कार्याची दखल घेत मला सन्मानित केल्याप्रित्यर्थ वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन चे खासदार बारणे यांनी आभार मानले.

error: Content is protected !!