वडगाव मावळ:
न्यू इंग्लिश स्कुल भोयरे विद्यालय येथे शासन परिपत्रकानुसार ग्रामीण भागात कोविड मुक्त गावातील ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत असणारे गावातील शाळेतील इ.8 वी ते 12 वी चे वर्ग सुरू करणे कामी ग्रामपंचायत स्तरावर सरपंच मा.श्री.बळीराम राणू भोईरकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली .
या समिती ची बैठक घेऊन शुक्रवार दि.15 जुलै 2021 रोजी पासून शासन निर्णयाने दिलेल्या सुचनांच्या आधीन राहून शाळा सुरू करण्याच्या बाबतीत चर्चा करण्यात आली.या समितीच्या बैठकीला सरपंच बळीराम भोईरकर,शाळा समिती अध्यक्ष श्री. गोरख जांभूळकर ग्रामसेवक, सौ. प्रमिला सुळके, पोलीस पाटील श्री.मंगेश आडीवळे आरोग्य अधिकारी. सौ साळे मॅडम विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!