टाकवे बुद्रुक: श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय वहानगाव येथे शासन परिपत्रकानुसार ग्रामीण भागात कोविड मुक्त गावातील ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत असणारे गावातील शाळेतील इ.8 वी ते 12 वी चे वर्ग सुरू करणे कामी ग्रामपंचायत स्तरावर सरपंच माननीय श्री नामदेवराव नाना शेलार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली व या समिती ची बैठक घेऊन शुक्रवार दि.15 जुलै 2021 रोजी पासून शासन निर्णयाने दिलेल्या सुचनांच्या आधीन राहून शाळा सुरू करण्याच्या ठरावास मंजुरी देण्यात आली.
या समितीच्या बैठकीला अध्यक्ष श्री नामदेवराव नाना शेलार,ग्रामपंचायत सदस्य बळीराम रामदास वाडेकर, ग्रामसेवक श्री तानाजी पाटील साहेब व विद्यालयाचे
मुख्याध्यापक माननीय श्री विनय नंदकुमार कसबे हे उपस्थित होते.

error: Content is protected !!