पिंपरी :गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप व त्यांची शैक्षणिक शुल्क भरणा करण्यात आली.
संस्कार प्रतिष्ठान कोल्हापूर विभागाच्या वतीने दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल, खोडरबर, कंपासपेटी,दप्तर इ.साहित्याचे वाटप केले जाते.
कोरोनाच्या कालावधीत आॕनलाईन अभ्यास जरी चालू असला तरी मोलमजुरी व धुणेभांडी करणाऱ्या कामगार कुटुंबातील मुलांना वेळेवर वह्या पुस्तके मिळत नाहीत.असाच एका कुटुंबातील २ विद्यार्थीनींना ( इयत्ता १२ वी व बी.कॉम.प्रथम वर्ष) चे शिक्षण वार्षिक शुल्क न भरल्यामुळे थांबले होते तसेच दुसऱ्या २ मुलांना इयत्ता ४ थी व इयत्ता ८ वी च्या शैक्षणिक साहित्याची ही गरज होती…या कुटुंबाला ही गरज आहे असे श्री अमित देशपांडे यांनी आम्हला कळवले व मदत होईल का अशी विचारणा केली..
त्यांची ही गरज ओळखून संस्कार प्रतिष्ठानच्या कोल्हापूर विभागाच्या वतीने त्या ४ विध्यार्थ्यांना वह्या,पुस्तके, पेन, पेन्सिल, खोडरबर, कंपासपेटी, मास्क, सॅनिटायझर दिले.
इतर २ विद्यार्थीनींचे शैक्षणिक शुल्क ही भरले, व साहित्य ही दिले जेणेकरून त्यांचे थांबलेले शिक्षण पुन्हा सुरू झाले .सर्व साहित्य पाहून मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघूनच समाधान मिळाले.नवीन शैक्षणिक वर्ष चालू झाले आहे, मात्र कोरोनामुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट आलेले आहे, त्यामुळे अनेकांना महाग पुस्तके, वह्या विकत घेणे अशक्य झाले आहे..अश्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून आम्ही संस्थेचे अध्यक्ष डॉ मोहन गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना मदत केली आहे. अधिक माहितीसाठी रेवती सचिन जरग जिल्हा अध्यक्षा
८८०६६०६७२९
संस्कार प्रतिष्ठान, कोल्हापूर

error: Content is protected !!