वडगाव मावळ:
बोरवली डाहूली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच नामदेवराव शेलार यांचे हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरवली येथील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायतच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या अंजना ठिकडे , शाळा व्यवस्थापन समिती बोरवलीचे अध्यक्ष बाळू दत्तू कदम, सदस्य भाऊ नामदेवराव जाधव, दिलीपराव मुगुटराव आलम कविता शेलार, सरिता शेलार व शाळेचे मुख्याध्यापक विनायक पारखे उपस्थित होते.
येत्या १५ जुलै पासून स्थानिक पातळीवर निर्णय ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याचे संकेत शासनाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर बोरवली तील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले आहे.
सरपंच नामदेवराव शेलार म्हणाले,” शासनाने दिलेल्या आदेशानुसार शाळा सुरू करण्या बाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. तूर्तास विद्यार्थ्याचे मनोबल वाढवून शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी गणवेश वाटप केले आहे. येत्या काळात ग्रामपंचायत हद्दीतील सर्व शाळा डिजिटलने जोडून आयएसओ प्रमाणित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.

error: Content is protected !!