वडगाव मावळ:
ग्रामीण भागाला जोडणा-या कदमवाडी सावळा,कामशेत जांभवली,वाडिवळे खांडशी रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. मावळचे आमदार सुनिल शेळके, मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे सार्वजनिक बांधकाम विभागाला या आशयाचे निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली.
कदमवाडी ते सावळा कामशेत ते जाभवली, उकसान
हे रस्ते खुप अरुंद आहेत. काही रस्त्याचे रुदीकरण आपल्या प्रयत्नातुन सुरू आहे. परतू काही रस्त्यांचे रुंदीकरण करणे खुप गरजेचे आहे.
या रस्त्याने प्रवास करताना खुप तारेवरची कसरत करावी लागते .या मार्गावर अनेक छोटे मोठ अपघात झाले आहेत.या भागातील दळणवळण
सुलभ करण्यासाठी व जनतेची गैरसोय दुर करण्यासाठी या रस्त्यांचा दोन्ही रुंदीकरण करणे गरजेचे बनले आहे. माजी सरपंच भिकाजी भागवत,सरपंच मोहन घोलप,बबुशा भांगरे, गोपाळ पवळे यांनी ही मागणी केली आहे.

error: Content is protected !!