मुंबई : 
पावसाळी अधिवेशनाच्या दोन दिवसात जनतेच्या हिताचे कामकाज करता आले याचे समाधान असल्याचे मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी म्हटले. विधिमंडळ अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. या अधिवेशनात ९ विधेयके दोन्ही सभागृहांनी मंजूर केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, संसदीय कार्य मंत्री अनिल परब, राज्यमंत्री संजय बनसोडे उपस्थित होते.
या दोन दिवसाच्या अधिवेशनात झालेल्या कामकाजाची माहिती मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी माहिती दिली.
●  मराठा आरक्षणासाठी पन्नास टक्क्यांची मर्यादा शिथील करण्याची केंद्र शासनाला शिफारस करणारा ठराव.
●ओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकारकडून इम्पिरिकल डेटा मिळविण्याचा ठराव
● २०१४ च्या ईएसबीसी उमेदवारांना मोठा दिलासा. तात्पुरत्या नियुक्त्या, वयोमर्यादेत वाढ
●महाराष्ट्र आयोगामार्फत १५ हजार ५१५ वर्ग एक आणि वर्ग दोनची पदे भरणार तसेच आयोगातील सदस्यांची रिक्त पदे ३१ जुलैपर्यंत भरणार  
● केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्यांत सुधारणा करून नवे विधेयक सादर
●आरोग्य विभागास प्राधान्याने निधी ( पुरवणी मागण्या)
●कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्याचा ठराव
  ●लसीकरण दरमहा वाढीव ३ कोटी डोसेस केंद्राकडून घेण्याबाबत ठराव
या शिवाय २३हजार १४९ कोटी रुपयांच्या पूरवणी मागण्यांमध्ये ग्रामीण आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी सर्वाधिक निधी.
   

error: Content is protected !!