वडगाव मावळ:
मावळ तालुक्यातील दरवर्षी पायी वारी करणार्‍या गरीब निष्ठावंत वारकऱ्यांना अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने कोषाध्यक्ष तुकाराम महाराज भांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कालेगाव येथे मोफत अन्नधान्याचे किट वाटपाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. हभप महावीर महाराज सुर्यवंशी यांच्या हस्ते हे किट वाटप करण्यात आले.कोरोनाच्या महामारीत सर्वसामान्य जनतेबरोबरच गरीब वारकरीही भरडला गेला. त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत त्यांना मदत म्हणून पंढरीच्या वारीचे औचित्य साधून अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने कालेगाव, टाकवे,वडगाव, शिवगंगा वृद्धाश्रम कामशेत येथे वारकऱ्यांना अन्नधान्याचे किट देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे मावळ तालुक्यातील पस्तीस दिंड्यांचे अध्यक्ष यांचाही आदरपूर्वक सत्कार करण्यात आला.
यावेळी विजय भोंडवे, सुखदेव महाराज ठाकर,संतोष कुंभार,भरत वरघडे, दिनकर निंबळे,शांताराम बोडके, दत्तोबा भोते, भामाबाई जाधव, दत्ता महाराज शिंदे, तुकाराम भांगरे पाटील,संजय कालेकर, नारायण केंडे, लक्ष्मण तळावडे, नंदाराम जाधव,साहेबराव देशमुख, अनुसयाबाई म्हस्के, छायाताई काकरे आदी मंडळाचे पदाधिकारी यांनी यासाठी योगदान दिले. यापुढे मंडळाच्या वतीने वारकरी बांधवांना सर्वतोपरी मदत करण्याचा संकल्प करण्यात आला.

error: Content is protected !!