टाकवे बुद्रुक:
जनसेवा हीच ईश्वराची सेवा आहे,मागील कित्येक वर्षापासून जनसेवेचे सुरू केलेले हे व्रत अखंडपणे असेच यापुढेही अशीच ठेवणार असल्याची ग्वाही महावीर हाॅस्पिटलचे सर्वेसर्वा डाॅ. विकेश मुथा यांनी दिली. अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने टाकवे बुद्रुक येथे मोफत अन्नदान कीट वाटण्यात आले यावेळी डाॅ. विकेश मुथा बोलत होते.
वारकऱ्यांच्या सेवेसाठी महावीर हाॅस्पिटल मध्ये मोफत औषधोपचार करण्यात येणार असल्याचे डाॅ.विकेश मुथा यांनी केले. वैराग्यमूर्ती शंकर महाराज मराठे, जिल्हा परिषद सदस्य शोभा कदम, माजी सभापती सुवर्णा कुंभार,उपसभापती शांताराम कदम,पुणे जिल्हा कुंभार समाज संघटनेचे अध्यक्ष संतोष कुंभार, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष नारायण ठाकर, भाजपाचे ज्येष्ठ राजाराम असवले, माजी सरपंच दत्तात्रय पडवळ, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुखदेव ठाकर, भाजपचे सरचिटणीस सुनिल चव्हाण,दत्तात्रय शिंदे,तुकाराम असवले, भरत वरघडे, तुकाराम भांगरे, आत्माराम शिंदे, तानाजी गुणाट, संजय कालेकर,नारायण केंडे आदि उपस्थित होते.
दिनकर निबळे यांनी प्रास्ताविक केले. संतोष असवले यांनी सुत्रसंचालन केले. नारायण ढोरे यांनी आभार मानले.

error: Content is protected !!