डाॅक्टर डे विशेष:
रुग्णसेवेचे व्रत घेतलेले डॉ. विकेश कांतीलाल मुथा. मावळातील सर्वसामान्यांना आपला वाटणारा डाॅक्टर.अनेकांना डाॅ.विकेश मुथा आधारवड वाटत आहे. मोठया हॉस्पिटल मध्ये,सरकारी दवाखान्यात रुग्णाला अ‍ॅडमिट करून घेण्यास टाळाटाळ केली. अथवा रूग्णालयात डाॅक्टरने फोन उचला नाही. तर शेवटाचा आधार म्हणून अनेक जण डाॅ.विकेश मुथा यांच्या कडे आशेने पाहतात.
फोन करून आमच्या पेशंटवर उपचार करा अशी विनंती करतात, कोणी हक्काने सांगतात. त्यावेळेस सेवाभावी असणारे डाॅक्टर मुथा क्षणांचा ही विलंब न लावता रिस्क घेऊन रूग्णांवर उपचार करीत आहेत. मागील वर्षी आणि याही वर्षी कोरोनात अनेकांना असा अनुभव आला आहे. कोणी तापाने फणफणत असो की, मोठ्या व्याधींनी त्रस्त त्यावर डाॅ.मुथा हेच रामबाण उपाय असा अनुभव आलेले अनेक जण भेटत आहेत.
त्यांना मुथा सर आपले आधार वाटला आहे. समाजात जीवनात काम करताना,संघर्ष कोणाला चुकला. टिका टिप्पणी,आरोपांची खैरात अनेकांच्या वाटायला आली,पण हे आरोप झेलतच अनेकांनी यशाची शिखरे गाठली,हे दृढसत्य विसरता येणार नाही. असो,सेवाभावी ही विरूदावली मिळवलेले डाॅ.मुथा कोरोना काळात रूग्णांची करीत असलेली सेवा वाखणया सारखी आहे.
प्रचंड इच्छाशक्ती
आणि सकारात्मक दृष्टिकोन दिसतो. दवाखान्यात कोरोना बाधीत अ‍ॅडमिट झाला की,त्याची प्रकृती कशी साथ देईल हे देवालाही माहित नसते,पण इच्छाशक्तीच्या जोरावर या रुग्णाला बरे करायचे आहे,ही सकारात्मक घेऊन डाॅक्टर आणि कर्मचारी मैदानात उतरतात.
रात्री ऑक्सिजन सिलेंडर संपणार आहे आणि माझ्या रुग्णांना त्याचा जास्त त्रास होऊ शकतो. मग ते आँक्सीजन सिलेंडरचे नियोजन असो की,रेमडीसीव्हरच,प्लाझ्मा असो की रूग्णांच्या दोन वेळेच्या सकस न्याहारीचे याचे बारकाईने नियोजन मुथा सर करीत असल्याचे येथे उपचार करून बरे वाटलेला रूग्ण सांगत होता.
मला रुग्णाचा जीव वाचवायचा आहे, या भावनेतून.रात्री अपरात्री ऑक्सिजन सिलेंडरची सोय करणारे डॉक्टर रुग्णांच्यानातेवाईकांनी जवळून पाहिले. रुग्णांची आपुलकीने चौकशी काळजी घेणारे हळवे मुथा ज्यांनी अनुभवले त्यांनाच माहित. हॉस्पिटल स्टाफ, कोरोना
रुग्णांना सकाळी हळदीचे दूध, काढा, पौष्टिक आहार आणि योग प्राणायाम यांच्यासह त्यांच्यात
सात्विक ऊर्जा निर्माण करण्यासाठी हे हॉस्पिटल प्रशासन कायम तत्पर असते. त्यामुळे त्यांची आणि
हॉस्पिटलची नाळ कधी जुळली हे त्यांनाच कळले नाही.
दवाखान्यात उपचार घेणा-या प्रत्येक रुग्णांची अस्थेने चौकशी आणि विचारपूस करणारे विरळ डाॅक्टर आहे,त्यात मुथांचा नंबर वरचा असेल.
ज्यांनी उपचारासाठी बिल दिले नाही,अशांचे उपचार कधी थकले आहे,अस कधी जाणवलं नाही. सर्वाना मदत करणारे मुथा सर यांच्या कामाला शुभेच्छा देणारे कित्येक सहकारी पाहिले आहे. अपवादात्मक एखादी दुसरी तक्रार होते ती ही होऊ नये इतकीच अपेक्षा.याही पुढे जाऊन डाॅ. मुथा यांचा सेवाभाव आपणाला दिसतो.
आषाढी वारीतील त्यांची आरोग्यदूत म्हणून कामाची पद्धत वाखण्या सारखी आहे.
कुठलाही बडेजाव नाही की, अॅटीट्युड नाही सेवाभाव हेच ब्रीद घेऊन ते काम करीत आहे. नैसर्गिक आपत्तीच्या वेळीही ते मदतीला धावून पुढे जात आहेत. पैशा अभावी कोणाचे उपचार रखडू नये असा त्यांचा दंडक आहे. उपचार घेऊन रुग्ण घरी जाताना त्याला हाशिलाला पैसे आहेत का? असा प्रश्न ते नेहमीच विचारतात. दारूच्या व्यसनात अडकून संसाराची वाट लावणा-या तळीरामांना सुधरविण्यासाठी त्यांनी ‘ आम्ही जीवन जाणतो ‘या बॅनर खाली दारूबंदीचे काम हाती घेतल आहे. या पुढे जाऊन संत विचार घरोघरी पोहचावे म्हणून ज्ञानेश्वरी निरुपण सोहळ्यात त्यांचा मोठा सहभाग असतो.
या वर्षी आषाढी वारीचे औचित्य साधून दरवर्षी पायी वारी करणा-या वारकऱ्यांना महावीर हाॅस्पिटल मध्ये मोफत उपचार करणार असल्याचे डॉ.मुथा यांनी सांगितले असून वारकऱ्यांना हेल्थ कार्डचे वाटप केले आहे.
आज डाॅक्टर डे समाजसेवेचे व्रत अंगी बाळगून सेवाभावी वृत्तीने काम करणा-या महावीर हाॅस्पिटल चे डाॅ.विकेश मुथा यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रात काम करणा-या सर्व डाॅक्टर मंडळींना शुभेच्छा देण्यासाठीचा हा लेखन प्रपंच.

error: Content is protected !!