मावळमित्र न्यूज विशेष: वारकरी संप्रदायाचा वसा लाभलेला अत्यंत शांत संयमी सतत हसतमुख असलेला युवक ही त्याची ओळखच खूप काही सांगून जाते.राजकारणातील हे उगवत नेतृत्व ,अत्यंत संयमाने ओतप्रोत भरले आहे. त्याच्या नेतृत्वाला गावाने आणि पंचक्रोशीतील जनतेने स्वीकारले. राजकारणातील ही दमदार इंट्री भविष्यातील नेतृत्वाची चाहूल आहे.
शेखर गबळू मालपोटे असे या तरूण सहकारी मित्राचे नाव,तो वारकरी संप्रदायातील. ज्ञानेश्वरी,गाथेतील ओव्या ऐकता ऐकता तो मोठा झाला. वारकरी संप्रदायाचे परस्पर सौख्याची शिकवण त्याने स्विकारली आणि अनेक मित्र मंडळी जमवली. शेती या पारंपरिक व्यवसायाला त्याने व्यवसायाची जोड दिली. कोणताच व्यवसाय लहान मोठा नसतो.व्यवसायातील सक्सेसने व्यवसायाची उंची वाढते हेच या तरुण मित्राने सांभाळले.
मावळ तालुक्यातील वाढते नागरीकरणामुळे,त्याने वीटभट्टीचा व्यवसाय सुरू केला.
लॅण्ड डेवलपमेंट व्यवसायात तो रमला आहे,मावळातील पर्यटनाला दिवसेंदिवस सुगीचे दिवस येऊ पाहत आहे. याच अनुषंगाने त्याने कृषी पर्यटन व्यवसायाला त्याने आपलेसे केले. घर प्रपंच उत्तम करता करता त्याने आंदर मावळ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष पदावर केलेले काम ही उल्लेखनीय आहे. या काळात पक्षाची ध्येय धोरणे आणि विचार त्याने घरोघरी पोहचवले.
तालुक्यातील सर्वच राजकीय नेत्यांशी त्यांची मैत्री स्नेह आहे. मैत्रीचा हा धागा असाच गुंफून हा तरूण पुढे चालेला आहे.ना कोणाशी स्पर्धा ना कोणाशी ईर्षा ,त्याची स्पर्धा स्वतःशी आहे.
आणि तो ही स्पर्धा एकाएका पायरीने जिंकत चालला आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत त्याच्या सौभाग्यवती प्रिया ताई या निवडुन आल्या आहेत. आंदर मावळात येणा-या पर्यटकांना उत्तम दर्जेदार खाण्याची आणि राहण्याची सोय व्हावी यासाठी आंदर मावळातील कृषी पर्यटन केंद्रांच्या वाढीसाठी शेखर मालपोटे वाड्या वसत्यांवर फिरून हे ही चळवळ उभी करीत आहे. शेखर मालपोटे ‘आंदर मावळ कृषी पर्यटन संस्थेच्या ‘अध्यक्ष पदावर काम करीत आहे.
याच माध्यमातून ते काम निर्विवाद पणे सुरू आहे. कोरोनाच्या संकटाने पर्यटनाला बंदी असली तरी आज ना उद्या ही परिस्थिती बदलले .
कोरोनात त्याने केलेले काम अनुकरणीय आहे, माझ्या सोबत माझ्या सहकारी मित्राना व्यवसायात उभे राहता यावे यासाठी तो करीत असलेली धडपड वाखण्यासारखी आहे,अशा या सहक-याचा आज वाढदिवस आहे,त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

error: Content is protected !!