कामशेत: संजय गांधी निराधार अनुदान योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी आहे. मात्र याकरिता लागणारे अर्ज व विविध दाखले उपलब्ध होण्यास फार वेळ जातो. अनेक हेलपाटे मारावे लागत असल्याने सर्वसामान्य जनता या योजनेकडे दुलर्क्ष करते. मावळ तालुक्यात या योजनेत लाभार्थी होऊ शकतात असे किमान 15 ते 18 हजार नागरिक असताना आता केवळ 3800 नागरिकांना याचा लाभ मिळत आहे.
गरजु व लाभार्थी यादेत बसणार्‍या नागरिकांनी कगदपत्रांसाठी होणारी धावपळ व त्रास कमी करण्यासाठी मावळ तालुका संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य गणेश काजळे यांनी स्वखर्चाने या लाभार्थ्यांनी आवश्यक असलेले अर्ज व दाखले उपलब्ध करून देण्याचे जाहिर केले आहे. जेणे करून तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल असे काजळे यांनी सांगितले.
संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत विधवा व घटस्फोटीत महिलांना दरमहा 1200/- रुपये लाभ मिळणार आहे. तसेच दिव्यांग बांधवांना (पुरुष/महिला) यांना 1000/- दरमहा, श्रावणबाळ निवृत्त वेतन योजनेंतर्गत 1000/- दरमहा, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्त वेतन योजनेंतर्गत 1000/- दरमहा, इंदिरा गांधी वृद्धपकाळ निवृत्त वेतन योजनेंतर्गत 1000/- दरमहा लाभ प्राप्त लाभार्थ्यांना मिळू शकतो.
वरील योजनांमध्ये बसत असलेल्या नागरिकांनी गणेश काजळे यांना कामशेत येथील दौंडे काॅलनी, कामशेत पवनानगर रोड, कामशेत येथे 9860744955/7028682333 या क्रमांकावर संपर्क साधावा.
त्याठिकाणी नागरिकांसाठी मदतकक्ष असणार असून पात्र नागरिकांना लागणारे अर्ज व आवश्यक असणारे शासकीय दाखले उपलब्ध करून दिले जाणार आहेत. नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन गणेश काजळे यांनी केले आहे.

error: Content is protected !!