मावळमित्र विशेष वडगाव मावळ:
तो अनाथ…साडेतीन वर्षाचा असताना त्याला पंढरपूर येथील रिमांड होममध्ये सोडलं.. त्याला मुडदूस (मॉल न्यूट्रिशन) झाला होता…या आजारावर उपचार होत नव्हता.. शासकीय रुग्णालयात उपचार करून त्याच्या तब्येतीत काहीच फरक पडत नव्हता. म्हणून गोपाळपूर,पंढरपुरातील येथील ऋषिंमुनींनी आयुर्वेदिक उपचार पद्धतीने तो बरा झाला.. गोरख चंद्रकांत उबाळे असे त्याचं नावं.
त्याने अनाथांच्या कामासाठी स्वतःला झोकून दिलं आहे. याच कामात तो इतका रमला आहे, की त्या तहान भूक विसरून तो या कामात मग्न झाला आहे. त्याचं म्हणण अस आहे, या जीवघेण्या आजारातून माझे प्राण वाचवले, ते समाजकार्यासाठी.
तो सध्या जे जीवन जगत आहे ते ऋषिमुनींनी कठोर तप करून, ज्ञानप्राप्त केलेल्या आयुर्वेदिक उपचार पद्धती मुळेच. हे त्याला मिळालेले जीवन आहे हे त्यांचं देणं आहे. पुढे या लेकराची बदली मुंबई येथील “बी.जे.होम”माटुंगा संस्थेत करण्यात आली. तेथे पाचवी पर्यंत शिक्षण झाले.तिथून डेव्हिड ससून इंडस्ट्रीयाल इस्कुल माटुंगा येथे पाठवण्यात आले.तिकडे दहावीपर्यंत शिक्षण झाले. पुढे दोन वर्षेचा इलेक्ट्रॉशन चा कोर्स केला. काम करत- करत बारावीचे शिक्षण पूर्ण केलं.आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने खूप हलाखीचे दिवस काढावे लागले.रात्री रस्ते खोदून केबल टाकण्याचे काम केले “जे काम भेटेल ते करत हा तो मोठा होऊ लागला. त्याच्या बरोबर चिल्ड्रन अँड सोसायटी मध्ये राहणाऱ्या तसेच महाराष्ट्रतील मुलांना घेऊन युवा आधार फौंडेशन या अनाथ मुलाच्या हक्काच्या संस्थेची त्याने स्थापन केली.
पुढे सिद्धार्थ कॉलेज फोर्ट मुंबई मधून ग्रॅज्युएशन पुर्ण केले. सामाजिक कार्यामध्ये रुची असल्याने त्याने मास्टर ऑफ सोशल वर्क ही पदवी मिळवली.
सामाजिक काम करत असताना बऱ्याच समस्या सोडवण्यासाठी कायद्याची आवश्यकता जाणवली. सध्या तो के.सी.लॉ कॉलेज चर्चगेट येथे लॉचे शिक्षण घेत आहे.याने स्थापन केलेल्या संस्थेने मागील बारा वर्षीत,अनेक अनाथ मुला-मुलीची लग्न लावली आहेत.
, टेक्निकल कोर्स, ड्रायव्हिंग कोर्स,हाऊसकिपी ट्रेनिग, नर्सिग कोर्स,बेसिक कॉम्पुटर कोर्स, आर्ट,कॉमर्स, सायन्स कॉलेजची १२० पेक्षा जास्त मुलाची फी भरण्यास मदत केली आहे.
अनाथ मुलांना संविधानिक अधिकार मिळवून देण्यासाठी राजेंद्र अनभुले ला सुप्रीम कोर्टात याचिका करण्यासाठी अनाथ मुलांचा डेटा उपलब्ध करून दिला. जेणे करून त्यांना न्याय देण्यात विलंब लागणार नाही
सामाजिक न्याय वसतिगृहात प्रवेश मिळवण्याचे मार्गदर्शन करतो, अनाथ ,निराधारान स्वतःच्या हक्कचे घर मिळून देण्याचे काम करत आहोत.
सक्षम महिला सामाजिक संस्थाच्या मधेमातून ४७० महिलांना चेंबूर येथील घरकाम करणाऱ्या,तसेच कचरावेचक महिलांना राशन वाटण्याचे काम केले. पाच दिवस सायन ट्रॉम्बे रोड मुंबईतून गावाला निघाल्या व्यक्तींसाठी शिजवलेले अन्न पॅकिंग करून वाटण्याचे काम केले’..ज्या मुलांकडे राशन कार्ड नव्हते अशा लोकांच्या फॉर्म भरून घेतले, तहसीलदार व सहायक आयुक्त यांच्या मदतीने रेशन कार्ड नसणाऱ्या गरजू लोकांना धान्य मिळवून देण्याचे काम केले.
लॉक डाऊनच्या दरम्यान महाराष्ट्रतील सर्व वसतिगृह बंद करण्यात आली आहेत.आशा मुल च्या जेवणाची सोय केली. सामाजिक जाणीव असणाऱ्या लोकांच्या सहाय्याने मागील १४ महिन्या पासून तो हे काम करत आहे. संस्थेच्या माध्यमातून ४२२ गरजू व्यक्तींना रेशन वाटण्यात आले.
त्याच्या कामाची दखल घेऊन केशव सृष्टी या संस्थेने महाराष्ट्रचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या शुभहस्ते ८ जानेवारी २०२१ रोजी त्याचा गौरव करण्यात आला. महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य विभागाच्या वतीने अनाथ निराधारच्या, कल्याणासाठी काम करत असल्या कारणाने सर्टिफिकेट आणि ट्रॉफी देऊन सत्कार केला.
अधिक माहितीसाठी: ९८९२३६७६५९.

error: Content is protected !!