कामशेत: शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त महावीर हाॅस्पिटलचे सर्वेसर्वा डाॅ. विकेश मुथा यांनी कोरोना संकटाच्या काळात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शिवसेनेच्या वतीने ‘ कोरोना योद्धा ‘पुरस्काराने गौरविण्यात आले.
आपल्या सेवा कार्यास सलाम…!
कोरोनाच्या या वैश्विक संकट काळात आपण अतिशय समपर्णभावाने करीत असलेले
सेवाकार्य मानवतेचे नितांत सुंदर दर्शन घडविणारे आहे. कोरोनाबाधित बंधू-भगिनींना तत्पर
आरोग्यसेवा मिळावी यासाठी आपण ‘आरोग्यदूत’ म्हणून अहोरात्र कार्यरत राहीलात…
आपल्या स्वत:च्या जीवाची पर्वा न करता जनसेवेसाठी या संकटकाळात आपण स्वत:ला
वाहून घेतले… म्हणूनच आम्हां प्रत्येकाच्या लोकमनात आपण केवळ आरोग्यदूत नाही
तर साक्षात ‘देवदूत’ आहात …..
या कोरोनामुळे शारिरीक स्वास्थ्य खचून जाताना कुटुंबातील व्यक्तींचे मानसिक बलही
खचले होते. या संकटकाळात आपण एका बाजूला आरोग्य सेवा देत होता तर एका बाजूला या
संकटाने खचलेल्या रुग्ण बंधू-भगिनींना व त्यांच्या परिवाराला मानसिक आधार देत राहिलात.
आत्मविश्वासाने जीवन जगण्याचा आशावाद त्यांच्या मनाच्या गाभाऱ्यात प्रज्वलित करीत
ाहिलात…. आमच्यासारख्या उद्याच्या उज्वल भविष्याची प्रकाशमान पणती हाती घेऊन या
संकटाच्या काळोखाशी संघर्ष करणाऱ्या सेवाभावी, निश्चयी व कर्तव्यदक्ष आरोग्यसेविका या
गळातील आदर्श कोरोना योध्दा’ आहात. आपल्या सेवा कार्यास आम्हांस सार्थ अभिमान आहे.
आपल्या कार्यास समस्त मावळवाशियांच्या वतीने सन्मान करताना मनस्वी आनंद होत
आहे… आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना….
अस्मानी संकटे येवोत कितीही । आंम्ही परतूनी लावू ।।
भारतभुमीचे वैभव माझ्या । नित्य उज्वल ठेवू ।।
या आशयाचे सन्मानचिन्ह देऊन डाॅ.विकेश मुथा यांच्यासह भाजपाचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर, राष्ट्रवादी सोशल मिडियाचे अध्यक्ष अतूल राऊत, देवाभाऊ गायकवाड यांच्यासह अनेकांना खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.यावेळी पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शरद हुलावळे,शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, नितीन महाराज काकडे, नारायण ठाकर आदि उपस्थित होते.

error: Content is protected !!