वडगाव मावळ:
मावळ तालुक्यातील कल्हाटचा तरुण मुंबईत डबे पोहोचवण्याचा व्यवसाय करतो.जालिंदर करवंदे असे या डबेवाल्या तरूणाचे नाव आहे. चित्रकलेची उपजत आवड असलेल्या जालिंदरने हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चित्र रेखाटले आहे.
शिवसेना वर्धापनदिनाच्या पूर्वेला जालिंदरने चित्रातून ही चित्र रेखाटून शुभेच्छा दिल्या आहेत. जालिंदर कांदिवली येथून डबे जमा करणारायचे आणी लोअर परेल येथे कार्यालयात डबे वितरीत करायचे हा त्याचा नेहमीचा व्यवसाय.
डबे पोहचवायच्या धावपळी मुळे अंगात कला असुन सुध्दा त्या केलेला म्हणावे तसे जोपासता आले नाही.
पण लॅाकडाऊन झाले डबे पोहचवण्याचा व्यवसाय पुर्ण पणे बंद झाला. जालिंदरचा व्यवसाय ही बंद झाला उपजिविकेसाठी कामतर केलेच पाहीजे. त्यासाठी तो आपले गाव कल्हाट ता.मावळ जि.पुणे येथील वडलोपार्जित शेती कसण्यास भावांना मदत करू लागला.
जालिंदरला चित्रकलेची पहील्या पासून आवड होती ही आवड जोपासण्यास त्याला आता वेळ मिळू लागला. शेतात काम करताना बांधावर विश्रांती घेताना जालिंदर आपल्या आजूबाजूचा निसर्ग आपल्या कुंचल्याने पानावर चित्रीत करू लागला.
लॅाकडाऊन झाल्या मुळे वेळ मिळाला आणी त्या वेळेचा उपयोग अंगातील कला जोपासण्यासाठी केला जावू लागला त्यातुंन एक चांगला चित्रकार तयार झाला. जालिंदर एक चांगला चित्रकार आहे त्याने अनेक चांगली चित्र काढलेली आहेत. एक सामान्य डबेवाला ही उत्तम चित्रकार असू शकतो हे आपल्या कलेच्या माध्यमातून जालिंदर करवंदे या डबेवाल्याने दाखवून दिले आहे.

error: Content is protected !!