लोणावळा :
येथील प्रधानपार्क मधील डॉ. हिरालाल खंडेलवाल यांच्या घरावर गुरुवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. या दरोडयात पन्नास लाख रुपये रोख व सोळा लाख ७७ हजार ५०० रुपयांचे दागिने असा साधारण ६६ लाख ७७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी पळविला आहे.
गुरुवारी दि.१७ जुनच्या च्या पहाटे दोन ते तीन
वाजण्याच्या दरम्यान हा दरोडा पडला. इमारतीच्या
पहिल्या मजल्यावरील स्लायडिंगची खिडकी खोलून
सहा जण धारदार शस्त्रांसह घरात घुसले.
अन्यकाही जण घराबाहेर थांबले होते. डॉ. खंडेलवाल
यांच्या बेडरुमचा दरवाजा उघडा असल्याने
दरोडेखोर थेट घरात घुसले. त्यांनी डॉक्टर व त्यांच्या
पत्नी यांच्या गळ्याला धारदार शस्त्र लावत हात पात
बांधत घरातील सर्व रोख रक्कम व सोनं असा ऐवज
त्यांच्या समक्ष लुटला.
साधारण अर्धा तासाहून अधिक काळ दरोडेखोर घरात होते. यानंतर गच्चीवरून चादर बांधत ते खाली उतरले व लंपास झाले. घटनेची माहिती समजल्यानंतर पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर
पोलीस अधिक्षक विवेक पाटील, सहायक पोलीस
अधिक्षक नवनित काँवत, पोलीस निरीक्षक दिलीप
पवार, पद्माकर घनवट यांनी घटनास्थळी भेट देत
माहिती घेतली.

error: Content is protected !!