शालेय जीवनात पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरून,त्यावर भरारी घेणारे विरळच. मला शिक्षिका व्हायचे आहे,हे स्वप्न पाहून प्रत्यक्षात उतरवलेल्या प्रभा भारत काळे या विद्यार्थी प्रिय शिक्षिका आहेत,ज्ञानदान करीत असतानाच ज्ञानसाधना करीत आहेत. विद्येची ही त्यांची साधना निश्चित प्रेरणादायी आहे.
प्रभा ताई B.A. B.Ed. व M.Ed शिकल्या आहेत,त्या संस्कृत विशारद आहेत. त्यांचा जन्म १६ जुन १९८६ रोजी अळकुटी, ता. पारनेर जिल्हा अहमदनगर येथे झाला. वडील शिकलेले गाव कामगार तलाठी व आई गृहिणी. मुळ गाव संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव तिथेच संस्काराची शिदोरी मिळाली. दुष्काळी भागातील गाव. अतिशय ग्रामीण खेडे गावच. दळणवळणाची साधने म्हणाल तर सकाळी एक एसटी व संध्याकाळची मुक्कामी गाडी सोडून तालुक्याच्या ठिकाणी येण्यास दुसरे साधन नाही.
संयुक्त कुटुंबातील प्रभाताई चार भावंडे आई वडील, आजी, दोन चुलते-चुलत्या त्यांची पाच मुले असे १६ ते १७ जणांचे शेतकरी कुटुंब.कुटूंबातील राबता ही मोठाच.
प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत तर माध्यमिक शिक्षण जवळच असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या साईनाथ विद्यालय, अळकुटी मराठी माध्यमाच्या शाळेत झाले. मार्च २००१ मध्ये १० वी ची परीक्षा ७१% गुण चांगले मिळाले.परंतु तालुक्याच्या ठिकाणाशिवाय सायन्स कॉलेज नसल्याने आणि गावापासून अंतर २५ ते 30 km. असल्याने
गावातीलच आर्ट्स कॉलेजला अॅडमिशन घेतले.
इयत्ता १०वी त असतानाच त्यांनी ध्येय निश्चित केले होते की, मला शिक्षक बनायचे .त्यासाठी DEd करायचे होते. चांगले गुण मिळविण्यासाठी त्यांनी नेटाने अभ्यास केला. पुस्तकांच्या अनेक उजळन्या केल्या. शेवटी प्रयत्नांना यश मिळाले. मला इयत्ता १२ वी त ७८% मिळाले. आजुबाजुच्या १६ गावच्या शाळांचे केंद्र असणाच्या महाविदयालयात तसेच तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून त्या उत्तीर्ण झाल्या.
शिक्षकांच्या, कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण केल्याचा आनंद तर होताच. पुढे मी DEd. प्रवेशाचा अर्ज भरला व केंद्रीय प्रवेश पध्दतीद्वारे कोल्हापुर येथील महाराणी शांतादेवी गायकवाड शिक्षण संस्थेच्या डी. एड महाविदयालयात प्रवेश मिळाला. १५०० रू. डी.डी. भरून यावर मी. DEd पूर्ण केले. मे २००६ मध्ये :
डी. एड चा निकाल हाती आला ७१% मिळवून महाविदयालयात दुसरे स्थान मिळविले. त्यानंतर कला महाविद्यालयाची पदवी BA पूर्व करण्याचे ठरविले. ५ ऑक्टोबर २००६ माझ्या प्रथम वर्षाच्या प्रथम सत्र परीक्षा सुरु असताना, तळेगाव दाभाडे येथे शिक्षक म्हणून कार्यरत असणारे मामा राम कदमबांडे नेण्यासाठी आले. त्याच दिवशी तळेगाव दाभाडे येथे येऊन,६ ऑक्टोबर 2006 रोजी मी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ या शैक्षणिक संस्थेमध्ये DEd शिक्षक पदासाठी मुलाखत दिली.
आणि ७ ऑक्टोबर २००६ रोजी मी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ शिक्षण संस्थेच्या नवीन समर्थ विद्यालय तळेगाव दाभाडे या मावळ तालुक्यातील नामांकीत शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाल्या.. या ठिकाणी इयत्ता . ५वी ते ८ वी (वी च्या वर्गाना सेमी Science मिळवीण्याची संधी मिळाली. पुढे २००८ एप्रिल मध्ये पवना विद्या मंदिर, पवनानगर येथे कार्यरत असणारे शिक्षक भारत काळे यांच्याशी विवाह झाला. पवन मावळ परिसरातील राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रात नावलौकीक असणाऱ्या काळे परीवारातील सुन बनण्याचा बहूमान मिळाला.
मे २००९ मध्ये पुत्ररत्न प्राप्ती झाली. त्यानंतर १ ऑगस्ट २००९ समर्थ विद्यालयातून माझ बदली पवना विद्या मंदिर पवनानगर विद्यालयात झाली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिकविण्याची संधी त्याचबरोबर मोठे आव्हानही समोर होते. कोणत्याही प्रकारचे क्लासेस नसूनही, कौटुंबिक वातावरणात शिक्षणाचा गंध नसताना विदयाथ्याची गुणवत्ता वाढविणे मोठे ध्येय होते.
काळे परिवाराचे हेच मुळ गाव असल्याने तळेगाव सोडून पुन्हा पवनानगर गाठले.येथे राहण्याचा निर्णय घेतला. वैवाहिक जीवनात स्थिर झाल्यानंतर, आपण शिक्षण चालूच ठेवले. यात पती भारत काळे यांचे मोठे सहकार्य व पाठिंबा मिळाला. यशवंतराव मुक्त महाराष्ट्र विद्यापीठात प्रवेश घेऊन बी. ए. पूर्ण केले .तेही अतिशय चांगल्या गुणांनी .
त्यानंतर मे २०१२ मध्ये कन्यारत्नांची प्राप्ती झाली. कुटूंब पूर्ण झाले. तीच्या संगोपनात ३ ते ४ वर्षे गेली. जुलै २०१५ मध्ये पुन्हा बदली संस्था नियमानुसार पवना विद्या मंदिरातून, नवीन समर्थ विद्यालय, तळेगाव दाभाडे येथे झाली. पुढे २००६ मध्ये शाळेतील संस्कृत अध्यापिका सेवानिवृत्त होणार होत्या .म्हणून शाळेतील सर्वच शिक्षकांना मुख्याध्यापकांनी संस्कृत विषय शिकविण्यास सुरवात करण्यास सांगितले ती जबाबदारी स्विकारली.
सुखातील काका वर्गाचे संस्कृत शिकविण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे संस्कृत विषय यापूर्वी त्यांनी कधीही अध्ययन केला नव्हता. तो आधी स्वतः शिकणे व नंतर शिकवणे असा त्यांचा नित्यक्रम बनला संस्कृत विषयात पदविका पूर्ण करण्यासाठी मी टिळक महाराष्ट्र विद्यापिठातून संस्कृत विशारद (बी. ए) पूर्ण करण्याचे ठरविले. प्रत्येक वर्षी नवीन वर्ग या क्रमाने दुसऱ्याच वर्षी माझ्याकडे शाळेतील. तीनही १० वीच्या वर्गाचे संस्कृत शिकविण्यासाठी आले .
२०१७ इयत्ता १०वीची संस्कृत ची पहिली बैच १००%. निकाल देण्यात त्या यशस्वी ठरल्या. शिवाय विद्यालयातील विद्यार्थी ५० पैकी ५० गुण मिळविले. २०१८ मध्ये त्या वडगाव महाविद्यालयात BEd शिक्षण पदविकेसाठी प्रवेश घेतला व नोव्हेंबर २०२० मध्ये ८०% गुण व’ ‘ ग्रेड सह उत्तीर्ण झाले. यादरम्यान तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन शिक्षक गटात प्रथम क्रमांक, टिळक महाराष्ट्र विद्यापीठा अंतर्गत शालेय व संस्कृत परीक्षा राज्यस्तरावर राबविल्या जातात. यामध्ये २०१८ मध्ये महाराष्ट्र राज्यात १००/९९ गु मिळवून राज्यात प्रथम क्रमांक मिळविण्याचा बहुमान त्याच्या विद्यार्थिनी मिळवला.
इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत मावळ तालुका गुणवत्ता यादीत १० वा क्रमांक मिळविणारा विद्यार्थी. त्यानुसार २०१८ सालचा पंचायत समितीचा मावळ तालुका आदर्श शिक्षक पुरस्काराचा बहुमान मिळाला. रोटरी क्लब ऑफ तळेगाव MIDC व समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठान यांच्या वतीने देण्यात येणारा स्वामी विवेकानंद गुणवंत शिक्षक पुरस्कार पुणे जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
सतत ४ वर्षे १० वीचा संस्कृत विषयाचा १००% निकाल अनेक कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करण्याची संधी मला मिळाली.एकत्र कुटुंब पद्धतीचा घटक असतानाही नोकरी बर आणि त्याबरोबर शिक्षण पूर्ण करण्याचे काम केवळ माझ्या पतीच्या भक्कम आधारामुळे झाले असे त्या आदरपूर्वक सांगतात. आजही त्या त्यांच्या नावापुढे शिक्षण लिखित नाही, कारण ते प्रत्येक वर्षी बदलते. त्यात काही ना काही नवीन पदवी जमा होते. आजही त्यांचे शिक्षण थांबविलेल नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून M.Ed. करत आहे याशिवाय वाचन, लेखन, नृत्य यांसारख्या छंदाला त्यांनी जोपासले आहे? भविष्यातही अनेक ध्येय साध्य करण्याचा मानस आहे.
त्याच्या अभ्यासूवृत्तीला,जिद्द,चिकाटी,आणि शैक्षणिक पर्वाला वाढदिवशी अनंत शुभेच्छा.

error: Content is protected !!