लग्नाच्या रेशीमगाठी या नशिबावर अवलंबून असल्या तरी,त्या जुळविण्यासाठी अत्यंत विश्वासू शब्दाची आणि वचनाची गरज असते. आणि शब्द मोठा विश्वासाने जो देतो,त्याच्याच पुढाकाराने हा आनंदाचा सोहळा जुळून येण्याचा योग येतो. हे सगळे करीत असताना पदरमोड करावी लागते.
प्रसंगी वेळ द्यावा लागतो कधी कधी उणीदुणी देखील ऐकावी लागतात,हे सगळे असले तरी लग्नाच्या रेशीमगाठी जुळून इतरांच्या आनंदात आनंद मानणा-या यादीतील मांदियाळीत शंकर रामदास मराठे हेही नाव घ्यावे लागले.
नाणोली तर्फे चाकण येथे राहणारा मनमोकळ्या स्वभावाचा,स्पष्टवक्ता आणि आपल्या रोखठोक बोलण्याने छाप पडणारा हा तरूण वयाच्या विसाव्या वर्षी ग्रामपंचायत निवडणूकीत निवडून आला. शेती आणि दूध या पारंपरिक व्यवसायात हा तरूण गुरफटून राहिला खरा,पण त्याची लोकसंग्रहता वाखण्या सारखी आहे.
सर्वसामान्य माणसाशी त्याची नाळ इतकी घट्ट आहे की, त्याच्या सुखदु:खात त्याच समरस होणे अगदी भावून जाते. जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती असे ही मानले जात. प्रत्येकाला छंद आणि आवड ही वेगळी असण हा स्वभाव आहे, आणि असणे गैर नाही.घरप्रंपच करीत असताना, आयुष्यातील सर्वात आनंदाचा सोहळा म्हणजे लग्न सोहळा या सोहळ्यात पुढाकार घेऊन लग्न घडवून आणणे हे पुण्याचेच काम आहे.
आजच्या परिस्थितीत लग्न सोहळा जमवणे म्हणजे मोठे दिव्य आहे, वधू वर यांच्या पसंती आणि अपेक्षा वाढल्या आहेत. काही वेळेस आपले आपले म्हणारे लग्नासाठी पुढाकार घेताना दिसून येत नाही. अशा वेळी लग्न सोहोळ्यासाठी पुढाकार घेणारे पाच पंचवीस ही मंडळीच आपल्याला आठवतात आणि यांच्या पुढाकारातून दोनाचे चार हात होतात, हे नाकारून चालणार नाही.
शंकरराव मराठे ही याच मांदियाळीतील मोठे नाव, दिवसभर आपल्या कामाधंद्यात राबणारा हा माणूस पहाडी आवाजाचा उत्तम भजनी आहे. अभंग, ओव्यांचे पाठांतर अगदी सहज पणे झाले.
आवाजातील माधूरता आणि गोडवा यामुळे शंकरराव वारकरी संप्रदायात प्रसिद्ध आहे. संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात ते सेवा बजावत आहेत. बैलगाडा या मर्दानी खेळाची त्याची आवड कधीच लपवून राहिली नाही. बैलगाडा शर्यती अगदी जवळून घाटात बसून बघायच्या .किंवा बैलगाडयाला बैल जुपून त्याच्या मागे झाली!!!!!अशी आरोळी ठोकून त्या मागे धावण्याचा अनुभव पाठीशी आहेच.
आजच्या स्वार्थाने डबडबलेल्या दुनियेत निस्वार्थ पणे काम करणारे शंकर सारखे विरळच. आयुष्य ऊन सावल्यांचा खेळ आहे. सुखाच्या पाठीशी दु:ख येणे हे निसर्गाचा नियम असला तरी सद्गुरू कृपेने जीवनाचे नंदनवन करायचे हे वाळवंट करायचे हे चिंतनात आहे. नेहमीच सकारात्मक दृष्टिकोनातून काम करणा-या या मित्राला वाढदिवशी हार्दीक शुभेच्छा…

error: Content is protected !!