कामशेत :
घरात बांधलेल्या साडीच्या झोळीत खेळणाऱ्या दोन सख्या भावातील मोठा १३ वर्षांचा मुलाच्या गळ्याला फास बसून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना कामशेत मध्ये.इंद्रायणी कॉलनी येथे घडली.
याबाबत आफरीन वसीम खान ( वय २४ वर्ष, रा.
इंद्रायणी कॉलनी कामशेत ) यांनी फिर्याद दिली असून
दिनेश गुप्ता ( वय १२ ) या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला
आहे.
कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार (
दि. ७) रोजी फिर्यादी यांच्या शेजारी बुध्दीलाल
जानकिप्रसाद गुप्ता हे त्यांची पत्नी व चार मुले यश
गुप्ता वय ( वय १६), वैभव गुप्ता ( वय १३ ), दिनेश
गुप्ता ( वय १२), राज गुप्ता ( वय ७ ) याचेसह राहत
आहे.
सोमवारी सायंकाळी ६.७५ सुमारास फिर्यादी घरात
काम करत असताना त्यांच्या घराचे शेजारी राहणारे
बुध्दीलाल जानकिप्रसाद गुप्ता यांचे घराच्या बाहेरील
गेटला कुलुप होते, त्यांच्या घराच्या गॅलरीत दिनेश गुप्ता
( वय १२ ) व राज गुप्ता ( वय ७) असे साडीच्या
बांधलेल्या झोळी वर खेळत असल्याचे फिर्यादी यांनी
पाहीले होते. थोड्या वेळाने ते घरातुन बाहेर येवुन त्यांनी
पाहीले असता बुध्दीलाल गुप्ता यांचा मुलगा दिनेश
गुप्ता
याचे गळ्याला तो खेळत असलेल्या साडीचा फास
लागलेला पाहीला. त्यांना संशय आल्याने त्यांनी लगेचच
त्यांचा भाऊ तोफिक यास बुध्दीलाल गुप्ता यांच्या
घराला असणारे कुलुप तोडायला लावले. व तेथे गेले व
दिनेश याच्या गळ्याभोवती असलेला साडीचा फास राज
गुप्ता यास काढणेस सांगीतला असता तो त्याने काढला
असता दिनेश हा जमिनीवर निपचित पडला व तो
हालचाल करत नव्हता त्याचे तोंडातुन जिभ बाहेर येवुन
दातात अडकली होती.
तो काहीएक हालचाल करत नसल्याने फियादी यांचा
भाऊ तोफिक, आणि पती वसीम यांनी दिनेश गुप्ता
यास स्कुटीवर संजीवनी हॉस्पीटल कामशेत येथे
उपचारास नेले. असता डॉक्टरांनी त्यास तपासुन तो
मयत झाला असल्याचे सांगीलते. याप्रकरणी पुढील
तपास पोलीस नाईक राम कानगुडे करीत आहेत.

error: Content is protected !!