कामशेत:
सुरूवातीला मज्जा म्हणून ते साॅफ्ट डिर्किंग घ्यायचे..पुढे इंग्लिश घेऊनच घरी बसून प्यायचे..हे काही महिने गेले. पैशाची बरबादी झाली. हातचे काम गेले..धंद्यात खोट आली. आणि मग ते देशी टाकून लोटत लोटतच घरी येऊ लागले. आता तर पिशवीतील फुगा प्यायला शिवाय पोट भरत नाही..
त्यांच्या पिण्याने घराची शांतता बिघडली. दारूच्या व्यसनाची आमचा संसार आला नजर लागली. वाद वाढू लागले. भांडण तंटा होतो आहे,मुला बाळांना कडे त्यांचे लक्ष नाही. कितीही समजवले तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही. आता त्यांची दारू कशी सोडायची काय औषधे आहेत का,कामशेतच्या महावीर हाॅस्पिटल मधील डाॅ.विकेश मुथा यांच्या केबिन मध्ये एक गृहिणी आपली व्यथा सांगत होती.
आज अशा तक्रारी दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत,कुणाचा पती दारूडया आहे. कोणाचा मुलगा,कोणाचा दीर,कोणाचा चुलता दारू च्या व्यसनात अडकला आहे. सुरूवात मौजमजेसाठी पेलेली दारू कित्येकांच्या आयुष्यात दु:ख घेऊन आली आहे. दारुड्या माणसाच्या वागण्याचा सर्वाधिक त्रास महिला सोसत आहेत.कधी दरडावून सांगत आहेत तर कधी रूसन फुगून पण त्याचा काहिही उपयोग होत नसल्याने या माहिला वैतागून गेल्या आहेत. रोजच्या त्रासाला वैतागून दारूडयांची दारू सोडवायला काय करावं या टेन्शन मध्ये त्या आहेत.
या प्रभावी उपाय योजना करावी यासाठी डाॅ. विकेश मुथा यांनी आम्ही जीवन जाणतो या बॅनर खाली दारू सोडविण्यासाठी हक्काचे केंद्र सुरू केले आहे. जिथे महिला येऊन आपल्या मुलाची,पतीची,नातेवाईकाची दारू सोडविण्यासाठी पुढाकार घेत आहेत. आता पर्यत चार हजार जणांनी दारू सोडल्याचा दावा महावीर हाॅस्पिटलचे डाॅ. विकेश मुथा यांनी केला आहे.
ऑषधोपचारा सोबत समुपदेशन करीत दारू सोडता येत याचा प्रत्यय अनेकांनी घेतला असल्याने येथे दारू सोडण्यासाठी दारू पिडीतांचे नातेवाईक येऊन सल्ला घेऊन जात आहेत. तोही अगदी मोफत.
मोफत मार्गदर्शनासोबत सुरुवातीला तीन महिन्याच्या गोळ्याचा कोर्स दिला जातो. समुपदेशन सोबत औषधांची गरज आहे, त्यानुसार दारूची इच्छा मोडले अशी औषधे दिली जातात.
नातेवाईकांनी कळत नकळत दारू पिणा-या व्यक्तीला गोळ्या द्यायच्या.दारुड्या ने या गोळया खाल्ली पाहिजे याची दक्षता घ्या. गोळ्या खाऊन तर तो दारू पिला तर त्याला बैचेन होणे,अशक्तपणा,चिडचीड वाढते,उलट्या होणे ही लक्षणे जाणवतील,त्यानंतर समुपदेशन सोबत योग्य औषधोपचार करून उपचार केले जातील. या उपचारात दारू पिणा-याचे मन अस्वस्थ होते. दारू पिण्याची इच्छा मरून जाते,असा दावा महावीर हाॅस्पिटलने केला आहे. अधिक माहितीसाठी: 9822403422

error: Content is protected !!