वडगाव मावळ:
आंदर मावळ भागातील विविध शाळांमधे शाफ्लर इंडिया लि. कंपनीच्या सामाजिक बांधिलकी (CSR) या उपक्रमाच्या माध्यमातुन इयत्ता पहिली ते सातवी च्या मोठ्या शाळांमधे BALA (Building as learning Aid) प्रकल्पांतर्गत दिपक फाऊंडेशनच्या पुढाकाराने 10 शाळांचे ज्ञानरचनावादी रंगकाम करण्यात आले.
आंदरमावळ भागातील अति दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना याचा विशेष लाभ मिळणार असल्याचे दिपक फाऊंडेशन च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
मावळातील निगडे, कल्हाट, आंबळे, इंगळुन, माळेगाव, मेठलवाडी, खांडी, वहाणगाव, वडेश्वर व नाणोली या शाळांचे रुप आता पुर्णपणे बदलले आहे.
त्याबद्दल या शाळांतील शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिति, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांमधे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दिपक फाऊंडेशनच्या मावळ तालुका सिनियर प्रकल्प समन्वयक डॉ. मिनल आचार्य, प्रकल्प समन्वयक ज्योती गाते, BALA प्रकल्प सल्लागार सतीश थरकुडे, अजय बाविस्कर, रुपाली घोजगे, निशा शिंदे, वर्षा पवार या अधिकाऱ्यांचे विशेष लक्ष प्रकल्प पुर्ण करण्यासाठी लाभले.
नगर जिल्ह्यातील प्रसिद्ध चित्रकार श्रीकांत आर्टस् च्या माध्यमातुन सर्व काम पुर्ण करण्यात आले. AB कंस्ट्रक्शनच्या माध्यमातुन BALA मॉडेल अंतर्गत घसरगुंडी, 3D आकृत्यांचे बांधकाम सुरु असुन सर्वच शाळांमधे लॉकडाऊन असतानाही शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिति, ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे सहकार्य लाभल्याने काम लवकर पुर्ण होत आहे.
शाफ्लर इंडिया लि कंपनीच्या माध्यमातुन या सोबतच फिरती प्रयोग शाळा, जवाहर नवोदय प्रवेश परीक्षांसाठी अधिकचे मार्गदर्शन वर्ग तसेच शिष्यवृत्तीसाठी शैक्षणिक साहीत्य वाटप, वाचनालयासाठी कपाट आणि पुस्तके देण्यात आली आहे. असे विविध उपक्रम सुरु असल्याचे शिक्षकांनी सांगितले.
तसेच मुलांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी शाफ्लर इंडिया लि. मार्फत सौरऊर्जा युनिट आणि त्यावर चालणारे पाणी फिल्टर यंत्र देण्यात आले आहे.
या सर्व उपक्रमासाठी शाफ्लर इंडिया लिमटेड यांच्या CSR टिम HR Head पल्लवी सरकार आणि मंगेश अरबुने यांचे विशेष मार्गदर्शन मिळत आहे.आता टाळेबंदी उठुन लवकर शाळा सुरु व्होवोत हिच अपेक्षा.

error: Content is protected !!