
घरची परिस्थिती हलाखीची,त्यामुळे पोटासाठी गाव सोडावं लागलं. किराणा मालाच्या दुकानात काम करून आयुष्याची पहिली कमाई केली. पाठीशी आई वडील भाऊ बहिणीचा राबता.मिळालेल्या कमाईत गुजराण होत असायची.
किराणा दुकानांत काम केले,गाई म्हशी संभाळल्या. वाढत्या वयाबरोबर जबाबदारी येतच होती. त्यात पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात नोकरी मिळाली. संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या राजकारणावर छाप पाडणा-या पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाने आपसूक राजकारणाकडे पाहाण्याचा सकारात्मक दृष्टिकोन बनला.
जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांच्या उठबस पाहून राजकारणात गाॅड फादरचे महत्व उमगले.पुणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे सभापती दिवंगत नेते दिलीपभाऊ टाटिया यांना गुरूस्थानी मानून राजकारणात येण्याचा मानस पुढे आला. चुलते जाखोबा भाऊराव वाडेकर हे ही गावचे सरपंच होते,गावाने साथ दिली.
गावासह पंचक्रोशीतील मित्रमंडळींनी राजकारणातील डावपेच घडवून सरपंच पदाची माळ गळ्यात पडली. किराणा मालाच्या दुकानात काम करून आपल्या जीवनाची सूरूवात करणारे सुदामराव यशवंत वाडेकर,९९९५ला डाहूली ग्रामपंचायतीचे सरपंच झाले.
ग्रामीण भागात काम करणा-या सरपंच ,उपसरपंच आणि सदस्यांची संघटना बांधून त्या मार्फत गावपातळीवर विकासाची कामे खेचून आणता येतील,या साठी स्थापन झालेल्या आंदर मावळ सरपंच संघटनेचे अध्यक्ष पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली.
माजी मंत्री मदनजी बाफना साहेब,सहकारमहर्षी माऊली दाभाडे,स्व. दिदीपभाऊ टाटिया,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाची गंगा खेडीपाडी पोहण्यासाठी काम केले. गावातील पिण्याचे पाणी,डांबरीकारणाचा पक्का रस्ता,शैक्षणिक संकुल या कामाला प्राधान्य देऊन ही कामे प्रत्यक्षात उतरवली .
राजकारणातील चढउतारावर प्रत्येकालाच अनुभवायला येतात,तसा अनुभव सुदामराव यांनाही आला.
पण राजकारणात,समाजकारणात मिळालेले पद येत आणि जात पण मैत्रीचा धागा आयुष्य भर टिकतो. हाच मैत्रीचा धागा सुदामरावांनी टिकवून ठेवला. त्यामुळेच आमदार सुनिल शेळके,संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे,माजी सभापती विठ्ठलराव शिंदे,पिंपरी चिंचवडचे नेते दत्तानाना पवळे,नगरसेवक गणेश खांडगे,कृषी पशुसंवर्धनचे सभापती बाबुराव वायकर,नगरसेवक किशोर भेगडे,माजी नगरसेवक अरूण पवार यांच्यासह अनेकांशी त्याच्या मैत्रीचा धागा तसूभर ही कमी झाला नाही.
मिळालेल्या पदाचा उपयोग हा कायम जनतेच्या हितासाठी असला पाहिजे हा कटाक्ष बाळगणा-या चुलता पुतण्याचा नुकताच डाहूली ग्रामपंचायतीच्या वतीने आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते सरपंच नामदेवराव शेलार यांनी सत्कार केला. आजच डाहूली ग्रामपंचायतीचे सरपंच नामदेवराव शेलार,माजी सरपंच सुदामराव वाडेकर यांचा वाढदिवस आहे,या निमित्ताने गेलेल्या गतकाळातील आठवणीना या निमित्ताने उजाळा देत दोघांनाही त्याच्या आप्तस्वकीयांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


