पाहिलेली स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी पराकोटीचा संघर्ष करीत यशाच्या शिखरावर पोहचलेल्या गाव कारभा-यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे. कौतुकाची थाप आज अंगावर पडत असली.तरी त्या मागे घेतलेले कष्ट, त्याग,मान ,अपमान ,संघर्ष,धाडस,लढावू बाणा अशा अनेक पैलूंना विसरता येणार नाही. संघर्ष जणू त्याच्या पाचवीलाच पुजलेला होता.
पण याच संघर्षातून ग्रामपंचायतीच्या इतिहासात हॅटट्रिक करण्याची किमया साधणारा हा नेता,विकासकामात उजवा ठरला आहे.घर प्रपंचाची जबाबदारी खंबीरपणे खांद्यावर पेलून,सामाजिक जीवनातही राजकारण,समाजकारणात तो नेटाने काम करतोय. ग्रामपंचायत हा ग्रामविकासाचा पाया आहे,याचे द्योतक ठाऊक असलेल्या तरूणाने त्या दृष्टीने टाकलेली पाऊले यशस्वी होत गेली .
राजकारणात,समाजकारणात निधड्या छातीने पुढे उभा राहणारा हा तरूण कार्यकर्ता कोण,असा प्रश्न पडलाच असेल तर आपली उत्सुकता फारशी ताणणार नाही.आंदर मावळातील बोरवली या निसर्गरम्य गावातील नामदेवराव नानाभाऊ शेलार असे या संघर्षातून पुढे आलेल्या तरूणाचे नाव.घरची शेती आणि दूध हाच पारंपारिक व्यवसाय. आई सखूबाई आणि वडील नानाभाऊ यांनी,नामदेव यास शिक्षणासाठी कान्हेतील छत्रपती शिवाजी विद्यामंदिर पाठवले.
तेथेच माध्यमिक शिक्षण घेऊन महाविद्यालयीन शिक्षण तळेगावात घेतले,आणि पिंपरीत नोकरी धरली. दोन भावांचा भरभराटीला आलेला प्रपंच दिवसेंदिवस फुलत चालला होता.
पण नियतीला हे मान्य नव्हते,नामदेवरावांचे थोरले बंधू प्रभाकरराव यांचे अकस्मित हे जग सोडून जाणं झाले. शेलार कुटूबियांवरील हा आघात कधीच भरून येणारा नव्हता. या दु:खाची छाया आजही त्या घटनेची जाणिव करून देते.कुटूबियांवरील हे दु:ख सावरून,नोकरी सोबत शेती आणि व्यवसायात नामदेवरावांनी स्वतःला गुंतवून घेतले. जी स्वप्न तुम्ही पाहता त्या स्वप्नांचा पाठलाग करताना थांबू नका,निरंतर चालत रहा हा विधात्याने घालून दिलेला नियम त्यांनी प्रत्यक्षात आणला आणि हा तरूण चालत राहिला.
लढत रहिला येणा-या प्रत्येक संकटावर मात करीत पुढे चालत राहिला. पुढे जाताना दमला,थकला,अनेक अडथळ्यांना पार करीत पुढे निघाला. अनेकांच्या टीका टिपण्या सोसल्या,कोणालाही प्रतिउत्तर न देता चालत राहिला.कुटूबियांची जबाबदारी पार पाडीत,स्वतःला सामाजिक कार्यात गुंतवून घेतले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपूर्वी युवक काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पद घेऊन,काँगेस विचाराला ग्रामीण भागात रुजवले. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यावर आंदर मावळ युवक काँग्रेसचे अध्यक्ष पद घेऊन,लोकनेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विचाराने भारावलेल्या तरूणाने युवक संघटनेत काम केले.
याच दरम्यान,महाराष्ट्रातील एकमेव अंजनीमाता मंदिराच्या जिर्णोद्धार कामात उद्योजक विठ्ठलराव भोसले यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. राष्ट्रसंत व करवीर पीठाचे शंकराचार्य यांच्या उपस्थितीत या मंदिराचा कलशारोहण सोहळा या पंचक्रोशीसाठी पर्वणी ठरला.याच पुण्याई वर पुढच्या काही दिवसात नामदेवराव डाहूली ग्रामपंचायतीचे सरपंच झाले. याच वेळी सहकारातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेत त्यांची निर्विवाद सत्ता आली. ग्रामविकासा सोबत सहकाराची मुहूर्तमेढ रोवून हा झंझावात अशाच सुरू राहिला.
राजकीय उलथापालथी झाल्या,दुस-या ट्रमला मुलगी प्रतिमा हिला सरपंच केली. पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या प्रतिमांच्या कामाची दखल घेऊन जिल्हा परिषदेने आदर्श सरपंच पुरस्कार दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही तिच्या कामाचे कौतुक केले. राजकारणातील यशस्वी घौडदौड सुरू असताना कौटुंबिक जबाबदारीचे ओझे खांद्यावर घेऊन हा गडी पुढे चालला होता .आता एका कुटूबांची जबाबदारी घेऊन चालणारी नव्ह्ती. रात्रंदिवस साथ सोबत देणाऱ्या सहका-यांची,त्याच्या सुख दु:खाची पर्वा होतीच. ती असायला पाहिजे होती,ती घेऊन हा माणूस निघाला होता.
भल्या मोठ्या रस्त्याने चालत राहिला,वाटेत अडथळे,स्पीड ब्रेकर,खड्डे,काटे कुटटे येणे स्वाभाविक होते,ते येत राहिले.तरीही हा माणूस चालत राहिला. सहका-यांनीच जिंकायची गाठ मनाशी पककी बांधली होती,त्यामुळे राजकारणातील साम,दाम, दंड ,भेद या नीतीने पून्हा विजयी शिखरावर बसवलेच. राजकारणातील या सगळ्या यशाचे वाटेकरी जिवाभावाचे सहकारी,ज्यानी अपार कष्ट घेतले,मतदारांनी मनापासून प्रेम केले या सगळ्यांचे हे श्रेय , त्या सहका-यांना यशाचे श्रेय दिले.
मावळचे आमदार सुनिल शेळके,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे,ज्येष्ठ नेते माऊलीभाऊ दाभाडे,संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे,नगरसेवक गणेश खांडगे हे आणि अन्य नेत्यांनी दिलेल्या आदेशानुसार सामाजिक जीवनातील वाटचाल सुरू ठेवणा-या या सरपंचाचा हा इतिहास मांडण्याचे कारण म्हणजे,सरपंच पदाची हॅटट्रिक मारल्यावर येणारा आजचा पहिला वाढदिवस या वाढदिवसानिमित्त समर्थकांनी वाढदिवसाचा जल्लोष सुरू केला आहे.या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना गतकाळातील आठवणी डोळ्यात तरळल्या आणि आपसूक शब्द उमटले. सरपंच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

error: Content is protected !!