टाकवे बुद्रुक: टाकवे बेलज हा रस्ता पूर्णपणे खड्ड्याचे माहेरघर झालेले आहे. हा रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत येत असून. या रस्त्याने वर्दळीचे प्रणाम खूप मोठ्या प्रमाणात . राजपुरी बेलज टाकवे दळणवळणासाठी शहरी भागाला जोडणारा हा एकमेव रस्ता आहे.टाकवे ते राजपुरी रस्त्याला 2016 -17 मंध्ये (7किलोमीटर )55 लक्ष तसेच 2017 ते 2019 टाकवे बेलज साठी 40लक्ष असा एकूण 95 लक्ष, निधी 5054 मधून उपलब्ध झाला आसता 2016-17 पासून दरवर्षी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. परंतु रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे काम झाल्यानंतर तीन ते चार महिन्यांमध्ये रस्ता पूर्णपणे खराब होत आहे.त्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे .यामध्ये प्रामुख्याने या रस्त्यावरून शाळेतील विद्यार्थी, दुग्ध व्यवसाय, शेतकरी, कामगार, तसेच या भागात फूल उत्पादक, बागायतदार, वीट भट्टी, स्टोन क्रेशर असल्यामुळे वाहतूक खूप मोठ्या प्रमाणात होत असल्या कारणाने रस्ता पूर्णपणे खड्डेमय झालेला आहे.सध्या रस्त्याची स्थिती अशी आहे की रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता आहे हे कळण्यास मार्ग नाही.खराब रस्त्यामुळे या भागात टू व्हीलर फोर व्हीलर यांचे छोटे-मोठे अपघात नेहमी घडत असतात, तसेच गाड्याचा मेंटनस वाढत असून नागरिकांना पाठीचे व मणक्याचे त्रास बळावत आहेत.या रस्त्यासाठी जिल्हा परिषेद मधून 2020/21 मंध्ये मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या मार्फत 5054 मधून 30 लक्ष निधी उपलब्ध झाला आहे. रस्त्याचे काम तातडीने पावसाळ्याच्या अगोदर हाती घेऊन रस्त्या पूर्ववत करावा, या रस्त्याच्या कामाचा दर्जा चांगला उंचावा यासाठी अजून निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच यासंदर्भात संबंधित विभाग व आमदार शेळके यांना निवेदन देण्यात येणार आहे.जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग.
टाकवे बेलज राजपुरी रस्त्यासाठी
2016-2019 मंध्ये असा एकूण 95 लक्ष निधी माजी आमदार बाळा भेगडे यांच्याकडून 5054योजनेतून उपलब्ध करण्यात आला होता.तसेच 2020/21 साठी मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या मार्फत 5054 योजनेतून मधून टाकवे बेलज रस्त्यासाठी 30 लक्ष निधी उपलब्ध झालेला आहे. टाकवे बेलज रस्त्याचे काम पावसाळ्यानंतर हाती घेण्यात येईल.
अशी माहिती जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंते सुरेश कानडे यांनी दिली.

error: Content is protected !!