वडगाव मावळ :
मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील चार कोटी पाच लक्ष रुपयांच्या विकास निधीतील निगडे ते शिरे रस्त्याचे भूमिपूजन निगडे गावचे सरपंच सविता बबुशा भांगरे व आंबळे गावचे सरपंच मोहन घोलप यांचे हस्ते करण्यात आले .
भूमिपूजन सभारंभास उपसरपंच सुरेखा नखाते,पोलीस पाटील संतोष भागवत,मा.सरपंच सोपान ठाकर ,मा.सरपंच मंगल मोढवे,मा‌.उपसरपंच नवनाथ मोढवे,मा.उपसरपंच रामदास शेटे,ग्रा.पं.सदस्य हनुमंत हांडे,ग्रा.पं सदस्य गणेश भांगरे, मा.उपसरपंच कैलास मोढवे,मा. उपसरपंच देविदास भांगरे,आं.मा. रा.काॅ.अध्यक्ष दिगंबर अगिवले,ह.भ.प.बजरंग तांबोळी, जेष्ट सा.का.नथुनाना पवार, रघुनाथ मोढवे सो.धोडींबा भागवत,उद्योजक श्रीकांतन मोढवे,उद्योजक नवनाथ मोढवे,ग्रा.पं.सदस्य.सिताराम भागवत,मा.ता.रा.काँ.सो.मि.सरचिटणीस शंकर मोढवे.आं.मा.सो.मि.अध्यक्ष राजेश पानसरे,अमोल मोढवे, ग्रा.पं.सदस्य निलेश भागवत,मा.उपसरपंच संतोष भांगरे ,सदस्य संभाजी भांगरे ग्रामस्थ उपस्थित होते.
शिरे गावात स्वातंत्र्या नंतर पहिल्यांदाच रस्ता होत असल्याने वडिलधारी मंडळी व तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
आंद्रा धरणात शिरे शेटेवाडी गावच्या जमिनी संपादित झाल्या आणि अनेक गावक-यांना शिरे सोडून स्थलांतरित व्हावे लागले. गावात जायला रस्ता नाही,वीज नाही की शाळा नाही अशी या गावची स्थिती होती. आता गावात एक एक सुविधा झाल्याने गावकरी आनंदित आहे.
गावात जायला लाल मातीचा रस्ता होता,त्याच रस्ताने गावक-यांचे येणे जाणे होत,आता या रस्त्याने स्थानिक विकासाला चालना मिळेल असा विश्वास शिरेचे ज्येष्ठ कार्यकर्ते रघुनाथ मोढवे म्हणाले.
माजी उपसरपंच रामदास शेटे म्हणाले,” आंद्रा धरणाच्या जलाशयाला शिरे गाव असल्याने येथे कृषी पर्यटन विकासाला मोठा वाव आहे. प्रथमतः गावाला डांबरीकरणचा पक्का रस्ता मिळाल्याने येथे पर्यटनातून रोजगाराच्या संधी मिळतील. त्यामुळे आपुसकच आर्थिक सुबत्ता आणि समृद्धी येईल.

error: Content is protected !!