तळेगाव दाभाडे :
घरगुती वादातून सुनेने सासूचा ब्लॉउजने गळा आवळून खून केल्याची घटना तळेगावात घडली. या सूनने मृतदेह
पोत्यात टाकून पुरावा नष्ट करण्यासाठी टेरेसवर ठेवला,तेथून मृतदेह पुन्हा राजेंद्र भांगरे यांच्या
बिल्डिंगजवळच्या झुडुपात मृतदेह टाकला. ही
घटना शुक्रवाटी (दि.२१) सकाळी दहा वाजता तळेगाव
दाभाडे (ता. मावळ) येथे घडली. खुनातील
आरोपींना रविवारी (दि.२३) सायंकाळी सहा वाजता अटककरण्यात आली आहे.
याप्रकरणी अमित गौतम शिंदे
(वय २२) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात
फिर्याद दिली आहे. बेबी गौतम शिंदे (वय ५० वर्ष, टा. टेल्को कॉलनीतळेगाव दाभाडे ता. मावळ) असे खून झालेल्यासासूचे नाव आहे.तर पूजा मिलिंद शिंदे (वय २२) वमिलिंद गौतम शिंदे (वय २९) टा. टेल्को कॉलनी,
तळेगाव दाभाडे, ता. मावळ) असे खुनातील आरोपी
सून व मुलाचे नाव आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी
दिलेल्या माहितीनुसार सासू बेबी शिंदे हिच्या सोबत
आरोपी सून पूजा शिंदे हिचे घरगुती कारणामुळे वाद
होत होते म्हणुन त्याचा राग मनात धरून आटोपी
पुंजा शिंदे हिने ब्लाऊजच्या सहाय्याने सासूचा गळा
दाबुन जिवे ठार मारून पुरावा नष्ट करण्याचे
उद्देशाने मृतदेह पोत्यामध्ये घालुन मृतदेह प्रथम
टेटेसवर ठेवुन पुन्हा सोसायटीचे राजेंद्र भांगरे यांचे
बंगल्याशेजारील प्लॉटमधील झुडपात नेऊन
टाकुन दिला. तसेच टेरेसवर व सोसायटीचे पाय-
यावर पडलेले रक्त आरोपी मिलिंद शिंदे याने धुऊन
पुसुन घेवुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

error: Content is protected !!