कामशेत:
मागील वर्षीच्या लाॅकडाऊन पासून शाळा बंद आहेत,ऑनलाईन शिकवण्यावर भर असला तरी त्याला मर्यादा येतात. दिवसभर घरी बसून मुलेही वैतागली आहेत. मोबाईल आणि टिव्ही हेच मुलांच्या रोजच्या राहण्याचे रुटीन बनले आहे. या सगळ्याला छेद देत,कामशेतच्या जिजस काइस्ट इंग्लिश मीडियम स्कूल ला पाचवी इयत्तेत शिकणारी अदिती विणकाम,भरतकाम,स्वयंपाक शिकली आहे.
तिने बनवलेल्या केकची चव न्यारीच आहे.
अदिती बाळासाहेब ङूबे वय-११ वर्ष तिने लाॅकडाऊन मध्ये शाळा बंद असल्याने ऑनलाईन अभ्यास करता करता, केक बनविणे,विणकामाचा छंद जोपासला आहे. या सर्व कामात तिला आईचे व आजीचे मार्गदर्शन लाभले.नात,आई आणि आजी असा त्रिवेणीसंगम असलेल्या स्त्रीशक्तीचे कर्तृत्व बहरायला वेळ कसा लागेल. अदिती ऑनलाईन आलेला अभ्यास पूर्ण करते. तिने हस्ताक्षराचा सराव ठेवला आहे.
वाचन ही करते. जेव्हा वेळ असेल तेव्हा चित्र काढते. आणि मग हे सगळ करता करता चिमुकल्या हातात सुई घेऊन लोकर घेऊन विणकाम करते. तिने बनवलेल्या विणकामाचे शेजारी पाजरी कौतुक करू लागले. तिने केलेले विणकाम तिने वडीलांच्या मोबाईल स्टेटस वर ठेवल्याने मामा,मावशी,आत्या ही तिचे कौतुक करू लागल्या आणि,कौतुकाची शाबासकीची थाप पाठीवर पडल्यावर अदिती विणकाम अधिक हुरूपाने करू लागली.
आई च्या मदतीने ती केक बनवायला शिकली. नातेवाईकात कोणाचा वाढदिवस असो की anniversary आदिती केक बनवून देणार हे समीकरण डुबे नातेवाईकात झाल आहे. आजी पाराबाई हरिभाऊ डुबे ला नातीचे आणि रंजना बाळासाहेब डुबे यांना लेकीच्या नाजूक हातांनी केलेल्या कलाकुसरीने मन भरून येते.

error: Content is protected !!